जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू; 50 जखमी

जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू; 50 जखमी

ओदिशातील पुरी येथे जगन्नाथ यात्रेदरम्यान मोठा अपघात झाला. जगन्नाथाच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी प्रचंड वाढल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर 50 भाविक जखमी झाले. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ ही घटना घडली.

बसंती साहू (36) आणि प्रेम कांती मोहंती (78) आणि प्रभात दास अशी मृतांची नावे असून सर्व मृतदेह पुरी वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले आहेत. भगवान जगन्नाथांचा रथ पाहण्यासाठी गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. अनेक जण खाली पडले. त्यांना अक्षरशः तुडवत भाविकांनी रथाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे अनेक जण चिरडले गेले. त्यातच तिघांचा मृत्यू झाला, तर तब्बल 50 जण जखमी झाले.

मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची भरपाई

चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून आपले सरकार सुरक्षेत कमी पडल्याची कबुली देत भाविकांची माफी मागितली आहे. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे. सुरक्षेत दिरंगाई अक्षम्य अपराध असून दोषी अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही माझी यांनी दिले असून जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वैन आणि पोलीस अधीक्षक विनीत अग्रवाल यांच्या बदलीचेही आदेश दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाला नोटीसही बजावण्यात आली आहे.

शुक्रवारी 600 भाविक गुदमरले

भगवान जगन्नाथांचा रथ गुंडीचा मंदिरात पोहोचला. दरम्यान, शुक्रवारी देवी सुभद्रा रथाभोवती प्रचंड गर्दी वाढल्याने तब्बल 625 भाविकांची प्रकृती बिघडली. गर्दी इतकी वाढली की मुंगी शिरायलाही जागा नव्हती. त्यामुळे भाविक अक्षरशः गुदरमले. 70 जणांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 9 भाविकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पुरेसे पोलीस, सुरक्षा दल तैनात नव्हते

चेंगराचेंगरी झाली त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नव्हती. पुरेसे पोलीस बळ आणि सुरक्षा दलाचे जवानही मोठय़ा संख्येने तैनात नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता आले नाही आणि चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;