सांगोल्यात ‘शक्तिपीठ’ला विरोध; शेतकऱ्यांनी मोजणी रोखली

सांगोल्यात ‘शक्तिपीठ’ला विरोध; शेतकऱ्यांनी मोजणी रोखली

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सरकारकडून वेग येत असून सांगोला तालुक्यातील चिंचोली आणि मांजरी या गावांमध्ये मोजणीस सुरुवात करण्यात आली, मात्र येथील शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध करीत ही मोजणी रोखली आहे. ज्या शेतकऱ्यांची मोजणीस सहमती आहे, अशा शेतकऱ्यांचेच क्षेत्र मोजण्यात येत आहे, असे ‘शक्तिपीठ’च्या मोजणीसंदर्भात प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र मोजणीदरम्यान पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 11) सुरुवातीस मांजरीतील काही शेतकऱ्यांनी या मोजणीला जोरदार विरोध केल्याने त्यांच्या जमिनींची मोजणी थांबवण्यात आली. चिंचोली गावातही विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची मोजणी थांबवण्यात आली.

शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगोला तालुक्यात शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत, ‘हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जात असून त्याची आवश्यकता नाही,’ अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर संयुक्त मोजणीस पोलीस संरक्षणात सुरुवात झाल्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे.

शक्तिपीठ महामार्गाची गरजच नसून तो रद्द केला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. महामार्ग शासनास करायचाच असल्यास अगोदर भूसंपादनाचा दर जाहीर करावा. शेतकरी त्या संदर्भात विचार करून निर्णय घेतील, मात्र शेतकरी संघर्ष समितीचा या महामार्गाच्या मोजणीस विरोध कायम आहे, असे सांगोला तालुक्यातील शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष सचिन देशमुख यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;