मायक्रोसॉफ्ट पुन्हा मोठी कर्मचारी कपात करणार
टेक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चिंता करायला लावणारी बातमी समोर आली आहे. कंपनी पुढील आठवड्यात म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठी कर्मचारी कपात करण्याची तयारी करत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, यावेळी कर्मचारी कपात ही आयबॉक्स विभाग आणि ग्लोबल सेल्स टीम्समधून केली जाणार आहे. यात हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. गेल्या 18 महिन्यात आयबॉक्समध्ये करण्यात येणारी ही चौथी कर्मचारी कपात आहे. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मध्ये जास्त गुंतवणूक करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List