50 खोक्यांमधला एक खोका दिसला, शिरसाटांची चौकशी होणार का? आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
50 खोक्यांमधला एक खोका शिरसाटांच्या व्हिडीओमध्ये दिसला, त्याची चौकशी होणार का, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला. 33 देशांनी ज्या गद्दारीची दखल घेतली ते 50 खोके एकदम ओके, त्यातलाच कदाचित हा खोका असेल, असा टोला लगावताना नोटबंदीनंतर नियम होता की दोन लाखांपर्यंतच रक्कम ठेवू शकतो, पण शिरसाटांच्या बॅगमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम दिसतेय. नोटबंदीनंतर झालेल्या कायद्यात शिरसाटांना सूट आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. शिरसाटांना आयटीची नोटीस थोडी उशिराच आली आहे. पण आयटीची नोटीस येऊनही ते ऐटीत फिरत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List