ते वेडे झालेत, त्यांना भाषासंघर्ष घडवायचा आहे; संजय राऊत यांचा घणाघात

ते वेडे झालेत, त्यांना भाषासंघर्ष घडवायचा आहे; संजय राऊत यांचा घणाघात

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मराठी विजयोत्सवावर केलेल्या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. ”लखनौ पेक्षा जास्त हिंदी मुंबईत बोलली जाते. इथे हिंदी चित्रपट, गाणी, नाटकं चालतात. पुस्तक वाचली जातात. हे भाजपवाले वेडे झाले आहेत. त्यांना महाराष्ट्रात सत्तासंघर्ष घडवायचा आहे’, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला.

”आशिष शेलार म्हणतात पहलगाममध्ये लोकांचा धर्म विचारून मारलं गेलं तसं महाराष्ट्रात भाषा विचारून मारले जातेय. काही लोकांना महाराष्ट्राची संस्कृती मान्य नाही, त्याविषयी विचारल्यावर त्यांना राग येतोय. त्यांच्या या वागण्याचा राग मंत्र्यांना देखील यायला हवा. मराठी भाषा महाराष्ट्रात नाही राहणार तर काय पाकिस्तानात राहाणार का? हा सरळ सरळ भाषेचा अपमान आहे. अतिरेक्यांसोबत तुलना होणं हे अत्यंत चकीचे असून ही भाजपची मानसिकता आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

”आम्ही कुणालाही मारलं नाही, भाजपवाले चुकीचे पसरवत आहेत. जे मराठी भाषा व महाराष्ट्राविरोधात बोलत आहेत त्यांच्याविरोधात आम्ही आहोत. जर उत्तर प्रदेशमध्ये हिंदीविरोधात काही बोलले तर तिथली लोकं आंदोलन करणारच ना. लखनौ पेक्षा जास्त हिंदी मुंबईत चालते. इथे हिंदी थिएटर, संगीत चाललं नसतं. आम्ही हिंदीत बोलतो. हे जे भाजपचे पागल लोकं आहेत ते वेडे झालेयत. यांना महाराष्ट्रात भाषासंघर्ष घडवायचा आहे. महाराष्ट्र हे राज्य लिंग्विस्टिक स्टेट आहे. हे त्रिभाषा सूत्र जे भाजपवाले इथे लागू करतायत ते जर त्यांना उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये लागू करायचे असेल तर तिसरी भाषा कोणती असेल? मराठी, तमिळ, बंगाली कोणती भाषा लागू करणार. हे आधी सांगा नंतर आमच्यावर प्रश्न करा, असेही संजय राऊत यांनी भाजपवाल्यांना सुनावलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वर्मा तुमचे मित्र आहेत का? मर्यादा पाळा! आडनावाने बोलावले; सरन्यायाधिशांनी वकिलाला फटकारले वर्मा तुमचे मित्र आहेत का? मर्यादा पाळा! आडनावाने बोलावले; सरन्यायाधिशांनी वकिलाला फटकारले
सर्वोच्च न्यायालयाने आज अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना त्यांच्या आडनावाने बोलावणाया वकिलाला फटकारले. ते तुमचे मित्र आहेत का,...
बंगालमध्ये मतदार याद्यांची फेरतपासणी होऊ देणार नाही, ममता बॅनर्जी यांनी ठणकावले
60 दिवसांत नव्या उपराष्ट्रपतींची निवड, राज्यसभेचे उपसभापती पाहणार काम
दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये रिसॉर्टमध्ये हायप्रोफाईल दारूपार्टी, छाप्यात मद्यधुंद 39 जणांना अटक
विधान भवन हाणामारी, नितीन देशमुख, सर्जेराव टकले न्यायालयीन कोठडीत; आणखी तीन आरोपींचा शोध सुरू
दुसऱ्यांच्या नावे धनादेश देऊन व्यापाऱ्यांना गंडा, ठाण्यातल्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
राज्यात 7 टक्के रक्तपेढ्या रक्त संकलनात मागे, राज्य रक्त संक्रमण परिषदेची माहिती