नितीश कुमार आणि भाजपने बिहारला गुन्ह्यांची राजधानी बनवली, राहुल गांधी यांची टीका
बिहारमध्ये एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावरून नितीश कुमार आणि भाजपने बिहारला गुन्ह्यांची राजधानी बनवली अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी म्हणाले की, पाटण्यात व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यामुळे सिद्ध झाले आहे की भाजप आणि नितीश कुमार यांनी मिळून बिहारला हिंदुस्थानची क्राईम कॅपिटल बनवलं आहे.
तसेच बिहारमध्ये चोऱ्या माऱ्या, गोळीबार आणि हत्या ही सामान्य बाब झाली आहे. गुन्हेगारी न्यु नॉर्मल झाले आहे आणि सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बिहारच्या बंधू आणि भगिनींनो हा अन्याय आपण आता सहन नाही करू शकत. जे सरकार तुमच्या मुलांची रक्षा नाही करू शकतो ते तुमच्या भविष्याची जबाबदारही नाही घेऊ शकत.
आता वेळ आहे नवा बिहार घडवण्याची, जिथे भिती नव्हे तर प्रगती असणार. या वेळी मत फक्त सरकार बदलण्यासाठी नव्हे तर बिहार वाचवण्यासाठी असणार आहे असेही राहुल गांधी म्हणाले.
पटना में व्यवसायी गोपाल खेमका की सरेआम गोली मारकर हत्या ने एक बार फिर साबित कर दिया है – भाजपा और नीतीश कुमार ने मिलकर बिहार को “भारत की क्राइम कैपिटल” बना दिया है।
आज बिहार लूट, गोली और हत्या के साए में जी रहा है। अपराध यहां ‘नया नॉर्मल’ बन चुका है – और सरकार पूरी तरह नाकाम।…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 6, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List