डेडलाईन ठरली, शुभमन गिल किती वर्ष कर्णधार राहणार? BCCI पर्यंत निरोप पोहोचला

डेडलाईन ठरली, शुभमन गिल किती वर्ष कर्णधार राहणार? BCCI पर्यंत निरोप पोहोचला

कसोटी क्रिकेटमधील ‘रोहितपर्व’ संपले आणि टीम इंडियाची धुरा युवा खेळाडू शुभमन गिल याच्या खांद्यावर आली. बीसीसीआयने मोठ्या आशेने त्याच्याकडे हिंदुस्थानच्या संघाचे नेतृत्व सोपवले. त्याच्याच नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत हिंदुस्थानला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. पाच फलंदाजांनी शतक ठोकूनही हिंदुस्थानला सामना गमवावा लागल्याने गिलच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. परंतु, हिंदुस्थानचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री गिलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका हरली तरी संघ व्यवस्थापनाने शुभमन गिलवर कर्णधार म्हणून विश्वास ठेवला पाहिजे, असे स्पष्ट मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. एका पराभवामुळे कर्णधाराच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. गिलला कर्णधार म्हणून स्थिरावण्यासाठी आणि संघाचा समतोल साधण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा, असेही ते म्हणाले.

अनुभवाने शुभमन गिल याच्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल. त्याला किमान तीन वर्ष कर्णधारपदावर राहू द्या. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा निकाल काहीही लागला तरी, बदल करू नका. किमान तीन वर्ष त्याला सोबत ठेवा, तो नक्कीच चांगली कामगिरी करेल, असेही शास्त्री म्हणाले.

एजबॅस्टनवर दिसणार बुमराचा दरारा? हिंदुस्थानी व्यवस्थापन बुमराची विश्रांती पुढे ढकलण्याच्या विचारात

गिल खूप परिपक्व झालेला आहे. पत्रकार परिषदेमध्ये तो ज्या पद्धतीने उत्तरे देतो आणि नाणेफेकीवेळी बोलते त्यावरून तो खूप परिपक्व झाल्याचे दिसते. गिलमध्ये यशस्वी कर्णधार होण्याचे सर्व घटक असल्याचे शास्त्री म्हणाले. तो अनुभवाने शिकला आणि परिस्थितीशी जुळवून घेऊ शकला तर जागतिक क्रिकेटच्या पटलावर त्याचेच नाव गाजताना दिसेल, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर….. Monsoon Health Care: पावसाळ्यात संसर्गाच्या आजारांपासून दूर राहाण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले ठरतील फायदेशीर…..
भारताला मसाल्यांची खाण म्हटले जाते. येथे अनेक प्रकारचे मसाले पिकवले जातात. ते केवळ अन्नाची चव वाढवतातच, पण शरीरालाही फायदा करतात....
विठ्ठलाचरणी अर्पण केला चांदीचा मुकुट, मुस्लिम तरुणाची विठ्ठलभक्ती
मुकुंदनगरमधून 880 किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर छापा; 2700 किलो गोमांस जप्त
कशेडी घाटात महामार्गाला भेगा
तोफांच्या सलामीने माउलींचे सोलापुरात स्वागत
150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती