… तेव्हा मी दारूच्या आहारी गेलेलो, आयुष्य देखील संपवणार होतो, आमीर खानचा धक्कादायक खुलासा

… तेव्हा मी दारूच्या आहारी गेलेलो, आयुष्य देखील संपवणार होतो, आमीर खानचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरून चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा आमीर खान त्याच्या एका वक्तव्यावरून चर्चेत आला आहे. आमीरने त्याचे पहिले लग्न आणि पहिल्या पत्नीविषयी सांगिताना हे वक्तव्य केलं आहे.

”रीनासोबत घटस्फोटानंतर मी नैराश्यात गेलो होतो. खूप एकटं वाटत होतं. काय करावे कळत नव्हतं. त्या काळात मी पहिल्यांदा दारू प्यायलो. मला दारूचे व्यसन लागले. मी दररोज दारू पित होतो. जवळपास दीड वर्ष मी दररोज दारू पित होतो. कधी कधी दारू पिऊन बेशुद्ध व्हायचो. रात्र रात्र दारू प्यायचो. एकदा तर मला हे आयुष्यच नको असे वाटायला लागलेले त्यामुळे मी दारू पिऊन स्वत:ला संपवून टाकायचे ठरवलेले. पण या सगळ्यात मला जुही चावला, सलमान खान आणि अनिल कपूर यांनी खूप मदत केली. त्यांच्यामुळे मी या व्यसनातून बाहेर पडलो, असे आमीर खानने सांगितले.

आमीर खान याने 1986 मध्ये रिना दत्ता हिच्याशी लग्न केले होते. 16 वर्षांच्या संसारानंतर आमीर आणि रिना यांनी काडीमोड घेतला. त्यांना आयरा आणि जुनैद अशी दोन मुलं आहेत. त्यानंतर आमीरने 2005 मध्ये किरण राव हिच्यासोबत लग्न केले. किरण व आमीर यांना सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला. आझाद असे त्याचे नाव आहे. किरण व आमीरने देखील 16 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. सध्या आमीर हा गौरी स्प्रॅट हिला डेट करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;