वार्म-अप म्हणजे काय? व्यायामापूर्वी तो करणे इतके महत्त्वाचे का आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती
अनेकजण व्यायाम सुरू करताना सरळच मुख्य वर्कआउटला सुरुवात करतात, मात्र हे टाळणं तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीराचं योग्य प्रकारे Warm-Up करणं हे जितकं आवश्यक आहे, तितकंच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. एक साधी तुलना केली, तर जसं गाडी सुरू करताना तिचा इंजिन आधी गरम करावं लागतं, तसंच आपल्या शरीरालाही हलक्या हालचालींनी गरम करावं लागतं, म्हणजे व्यायाम करताना आपलं शरीर सर्वोत्तम कामगिरी करू शकेल.
Warm-Up म्हणजे नेमकं काय असतं?
‘वार्म-अप’ म्हणजे शरीराला व्यायामासाठी तयार करण्याची प्रक्रिया. यात जोरदार हालचाली नसतात, तर सौम्य आणि नियंत्रित हालचालींचा समावेश असतो. उदा. सौम्य जॉगिंग, स्ट्रेचिंग, आर्म सर्कल्स, लेग स्विंग्स, स्किपिंग अशा क्रिया ज्यामुळे शरीराच्या स्नायूंना रक्तपुरवठा वाढतो आणि शरीर हळूहळू सक्रिय होतं.
Warm-Up का आहे इतकं महत्त्वाचं?
1. थंड आणि अकार्यक्षम स्नायूंमध्ये व्यायाम करताना दुखापत होण्याचा धोका अधिक असतो. पण वॉर्म-अप केल्याने स्नायू लवचिक होतात.
2. सौम्य हालचाली केल्याने हृदयाचे ठोके वाढतात आणि स्नायूंना अधिक ऑक्सिजन आणि पोषणद्रव्ये मिळतात, ज्यामुळे ते अधिक प्रभावीपणे काम करू शकतात.
3. वॉर्म-अप करताना होणारी स्ट्रेचिंग शरीराला अधिक लवचिक बनवते. त्यामुळे व्यायाम करताना हालचाल (range of motion) करणं सोपं जातं.
4. warm up केल्याने शरीर पूर्णपणे व्यायामासाठी तयार होत, ज्यामुळे तुम्ही अधिक वेळ व्यायाम करू शकता.
5. फक्त शरीरच नव्हे, तर मेंदूलाही व्यायामासाठी सज्ज करणं गरजेचं असतं. त्यामुळे वॉर्म-अप तुम्हाला फोकस करण्यात आणि ‘वर्कआउट मोड’ मध्ये जाण्यात मदत करतं.
हे दोन प्रकारचे वॉर्म-अप केल्यास मिळतो अधिक फायदा
डायनॅमिक स्ट्रेचिंगमध्ये हात-पाय फिरवणे, लेग स्विंग्स, हाय नीज अशा हालचालींचा समावेश असतो, ज्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह वाढतो, स्नायूंना उष्णता मिळते आणि लवचिकता सुधारते. दुसरीकडे, हलक्या पद्धतीने धावल्याने हृदयाचे ठोके स्थिरपणे वाढतात आणि शरीर पूर्णतः व्यायामासाठी तयार होतं. हे दोन्ही प्रकार मिळून शरीराला दुखापतीपासून वाचवतात, व्यायाम अधिक प्रभावी बनवतात आणि मानसिक तयारीसुद्धा उत्तम होते. म्हणूनच व्यायाम सुरू करण्यापूर्वी हे दोन वॉर्म-अप प्रकार अवश्य करावेत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List