पावसाळी वातावरणात ‘हे’ 5 प्रकारचे चहा एकदा प्या, पावसाची मजा होईल द्विगुणीत
पावसाळा ऋतू सुरू झाला की वातावरण मस्त आल्हाददायक होते. तर या दिवसात चहा पिण्याची एक वेगळीच मज्जा असते. जोरदार पावसात रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या चहाच्या दुकानात जाऊन उभं राहून मस्त गरमगरम चहाचा घोट घेत पिणे खूप भारी वाटते. कारण पाऊस आणि चहा हे एक सुंदर समीकरण आहे. पावसाळ्यात वेळ कोणतीही असो पण चहा म्हटलं की तो प्यावासा वाटतोच. तर हा पावसाळा म्हणजे चहाची आवड हक्कांन भागवून घेण्याचा काळ. तर या पावसाळ्यात चहाची आवड चवीचवीनं घेण्यासाठी आजच्या या लेखात आपण चहाचे 5 प्रकार सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमच्या पावसाळ्यातील आनंद द्विगुणीत कराल. कारण पावसाळा हा चहा पिण्यासाठी सर्वोत्तम असतो.
आपल्या भारतात तुम्हाला प्रत्येक राज्यात, शहरात आणि गावात प्रत्येकानुसार चहाची अनोखी चव चाखायला मिळेल. त्याचप्रमाणे, वेगवेगळ्या चवींच्या चहाच्या रेसिपी देखील येथे लोकप्रिय आहेत. या लेखात, आपण अशाच 5 वेगवेगळ्या चवीच्या चहांबद्दल जाणून घेणार आहोत जे पावसाळ्याची मजा द्विगुणित करतील.
मसाला चहा
जर आपण पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चवीच्या चहाबद्दल बोललो तर लोकांना मसाला चहा सर्वात आधी लक्षात येतो. त्याची चव खूप तीव्र असते आणि तो पिताच ताजेतवाने वाटते. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात मसाला चहा पिणे मजेदार असते, परंतु तुम्ही घरी सुद्धा चहाचा मसाला तयार करू शकता आणि पावसात मसाला चहाचा आनंद घेऊ शकता.
तंदुरी चहा
मसाला चहा नंतर, तंदुरी चहाबद्दल जाणून घेऊयात. तर या तंदूर चहाची गोड आणि सुगंधी चव मनाला समाधान देते. प्रत्येकाला कुल्हडमध्ये चहा पिणे आवडते, परंतु तंदुरी चहा मातीच्या भांड्यांमध्ये बनवला जातो. चहा तयार केल्यानंतर, तो मोठ्या आचेवर भाजलेल्या मातीच्या भांड्यांमध्ये ओतला जातो, ज्यामुळे त्याला एक वेगळाच सुगंध आणि चव येतो.
इराणी चहा
तुम्ही कधीतरी इराणी चहा ट्राय केला असेल. हा क्रिमी चहा बनवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे आणि त्याची पोत खूपच क्रिमी आहे. हा चहा इराणी पाव किंवा बिस्किटांसोबत दिला जातो.
काश्मीरचा कहवा चहा
काश्मीरचा कहवा चहा परदेशी पर्यटकांनाही आवडतो आणि तो केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. तर हा चहा केशर, दालचिनी, लवंग आणि बदाम आणि अक्रोड सारख्या नट्सपासून बनवला जातो. तुम्ही हा सुगंधी चहा एकदा नक्की प्या.
काश्मिरी नून चहा
कहवा व्यतिरिक्त काश्मिरी नून चहा देखील काश्मीरमध्ये खूप लोकप्रिय आहे. तो इतर चहापेक्षा खूप वेगळा दिसतो. तर हा चहा पाहून तुम्हाला असे वाटेल की कोणीतरी तुमच्यासमोर शेक ठेवला आहे. खरं तर हा चहा गुलाबी रंगाचा आहे आणि त्याची चव देखील सामान्य चहापेक्षा खूप वेगळी आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List