US airstrikes on Iran – इस्रायल-इराण युद्धामध्ये अमेरिकेची उडी, इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला

US airstrikes on Iran – इस्रायल-इराण युद्धामध्ये अमेरिकेची उडी, इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला

इस्रायल-इराणमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: आपल्या एक्स (आधाचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. यात फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या आण्विक तळांचा समावेश आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये हे तळ पूर्णपणे नष्ट झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा हल्ला यशस्वी झाला असून सर्व विमानं सुरक्षित परत आल्याचे त्यांनी म्हटले.

‘अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन ठिकाणच्या आण्विक तळांवर यशस्वी हल्ले केले आहेत. हल्ल्यानंतर सर्व विमानं इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर आली आहेत. फोर्डो या मुख्य आण्विक तळावर बहुतांश बॉम्ब टाकण्यात आले असून सर्व विमानं सुरक्षितपणे घराच्या दिशेने जात आहेत’, असे ट्रम्प यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले.

इराणमध्ये खामेनी युगाचा अंत? उत्तराधिकारी जाहीर

यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकन सैनिकांचेही अभिनंदन केले. ‘अमेरिकेच्या महान योद्ध्यांचे अभिनंदन. जगातील इतर कोणतेही सैन्य अशी कारवाई करू शकत नाही. आता शांतता प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे. या मुद्द्यांकडे लक्ष दिलेत त्याबद्दल आपले आभार’, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दोन आठवड्यांची मुदत दिली होती. या मुदतीआधीच अमेरिका युद्धात उतरली आणि इराणमध्ये घुसून हल्ले केले. अमेरिकेने यासाठी बी-2 स्टील्थ बॉम्बर विमानांचा वापर केला. या विमानांद्वारे 30 टॉमहॉक मिसाईल डागण्यात आली. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प 10 वाजता अमेरिकेला संबोधित करणार आहेत. ते काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इराण खरा मित्र! हिंदुस्थानचे मौन म्हणजे मूल्यांचे आत्मसमर्पणच, सोनिया गांधी यांचा लेख गाजला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश
वाहतुकीच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारा माझा नातेवाईक असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे, असा इशारा...
बेळगावातील कन्नड सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार!
युरोपीय युनियन, मेक्सिकोवर टेरिफ बॉम्ब डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, 1 ऑगस्टपासून होणार लागू
रंगभूमी- चिंतन नियतीवादाचे
कृषिभान- वाटचाल कुपोषणाकडून उपोषणाकडे!
माधुरीला गुजरातला पाठवण्यास विरोध, हायकोर्टाने राखून ठेवला निकाल; कोल्हापुरातील जैन संस्थेच्या हत्तीणीच्या स्थलांतराला आव्हान
विशेष – ‘उत्तराधिकारी’ निवडीचे भूराजकीय पडसाद!