IPL 2025 – Operation Sindoor च्या विजयाचे हिरो फायनलमध्ये राहणार उपस्थित

IPL 2025 – Operation Sindoor च्या विजयाचे हिरो फायनलमध्ये राहणार उपस्थित

IPL 2025 आता अंतिम टप्प्यात आली असून फायनलचा थरार 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. फायनलमध्ये धडक मारण्यासाठी पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपापसात भिडतील. यांच्यातील दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी द्वंद्व होईल. फायनलचा थरार पाहण्यासाठी हिंदुस्थानच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांना BCCI ने आमंत्रित केलं आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर हिंदुस्थानने “ऑपरेशन सिंदूर” राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काही दिवस दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आयपीएल सुद्धा 9 मे पासून काही दिवसांसाठी स्थगित केली होती. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकातही बदल झाला आणि जी फायनल 25 मे रोजी खेळली जाणार होती, ती आता 2 जून रोजी खेळली जाणार आहे. या सामन्यात BCCI ने तिन्ही दलाच्या प्रमुखांना म्हणजेच लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग आणि इतर प्रमुख अधिकारी आणि जवानांना आमंत्रित केलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा जल्लोष करणे हा या मागचा मुळ हेतू असल्याचे, BCCI ने म्हटलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार
एसटी महामंडळाच्या नव्या  बसेस मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे कॅमेरे 360 अंशातून निगराणी...
सोसाट्याचा वारा अन् तुफान सरी, मुंबईत पुन्हा पाऊस; लोकलच्या वेळापत्रकाचं काय?
“यै मौसम का जादू है मितवा…”, पावसात धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा छत्री घेऊन रेन डान्स
ऐश्वर्या नारकरांच्या मुलाचा एअरपोर्टवर खुल्लम खुल्ला रोमान्स; पहा व्हिडीओ
वडिलांचे अफेअर्स असूनही आई घटस्फोट का देत नाही? सूरज पांचोलीने सांगितलं खरं कारण
जेनिफर विंगेटने करण सिंह ग्रोवरला का दिला घटस्फोट? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकीत!
Skin Care- चेहऱ्यावर साखर लावा, सुरकुत्या घालवा! वाचा सविस्तर