धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा
शिवसेनेचे अचलपूर विधानसभा संघटक धीरजराजे सातपुते यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळय़ाचे आयोजन केले आहे. उद्या, बुधवारी सायंकाळी 6 वाजता ब्राह्मणवाडा थडी येथे ग्रामपंचायतीसमोर चौकात जाहीर सभा व व्याख्यान होणार असून प्रमुख वक्ता म्हणून साक्षी भेले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया व्यक्तींचाही सत्कार करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List