पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या CRPF च्या जवानाला अटक, धक्कादायक माहिती आली समोर
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सीआरपीएफ जवानाला राष्ट्रीय तपास संस्थेकडून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या सात दिवसांपूर्वी हा जवान पहलगाममध्येच होता. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने ज्या जवानाला अटक केली आहे तो जवान हल्ल्याच्या सहा दिवसांपूर्वी पहलगाममध्येच होता. सहा दिवसांपूर्वी या जवानाची बदली झाली होती. राष्ट्रीस तपास संस्थेने या जवानाला दिल्लीतून अटक केली असून चौकशी सुरू आहे. आरोपी सीआरपीएफचा जवान मोती राम जाट हा 2023 पासून राष्ट्रीय सुरक्षे संबंधित माहिती पाकिस्तानला देत होता. या कामाच्या मोबदल्यात मोती रामला पाकिस्तानकडून पैसे मिळत होते.
या प्रकरणी सीआरपीएफने जवान मोतीरामला बडतर्फ केले आहे. केंद्रीय तपासंस्थांनी मोती रामच्या सोशल मीडियावर बारीक नजर ठेवली होती. तेव्हा मोती रामने प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे समोर आले. त्यानंतर सीआरपीएफने कारवाई केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List