जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखाली, ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांचा शोपियानमध्ये चकमकीत खात्मा

जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखाली, ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांचा शोपियानमध्ये चकमकीत खात्मा

शस्त्रसंधी होऊनही जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखालीच आहे. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंधाधुंद गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर शाहीद कुट्टीचा या दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे.

दक्षिण कश्मीर जिल्ह्यातील शुक्रू किल्लर परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम तीव्र केली आणि दहशतवाद्यांना चोहो बाजूंनी घेरले. यादरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना पंठस्नान घातले. लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर शाहीद कुट्टी आणि अदनान शफी तसेच हरीस नझीर अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. कुट्टी आणि शफी हे शोपियानचे तर नझीर हा पुलवामाचा रहिवासी आहे. कुट्टी हा शोपियान जिह्यातील छोटीपुरा हीरपोरा येथील रहिवासी असून त्याने मार्च 2023 मध्ये तो लश्कर-ए-तोयबामध्ये गेला होता. तो लश्कर-ए-तोयबाच्या ए श्रेणीतील टॉपचा कमांडर होता.

शाहीद कुट्टीचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग

कुट्टीचा अनेक दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग होता. हीरपोरा येथे 18 मे 2024 मे रोजी भाजप सरपंचाची हत्या झाली होती, त्यातही तो सहभागी होता. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली होती, त्यात कुट्टीच्याही घराचा समावेश होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून कुट्टी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे लष्करी अधिकाऱयांनी सांगितले, तर शफी हा ऑक्टोबर 2024 मध्ये लश्कर-ए-तोयबामध्ये गेला होता. तो संघटनेतील सी श्रेणीचा दहशतवादी होता.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे पोस्टर्स लागले; 20 लाखांचे बक्षीस

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी घेणारे दहशतवादी अद्याप फरार आहेत. याप्रकरणी रेखाचित्र जारी करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांचे पोस्टर्स जम्मू-कश्मीरमध्ये सर्वत्र लावण्यात आले आहेत. त्यांना शोधून देणाऱया किंवा त्यांची माहिती देणाऱयास 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. दक्षिण कश्मीर जिह्यात सर्वाधिक पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्व मजकूर उर्दूमध्ये लिहिण्यात आला आहे. आसिफ फौजी, सुरेमान शाह आणि अबू तलहा अशी या दहशतवाद्यांची नावे असून मुसा, युनूस आणि आसीफ अशी त्यांची कोड नावे आहेत. पूंछ जिह्यातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग आहे.

राजौरीत जिवंत बॉम्ब निकामी
जम्मू-कश्मीरमधील राजौरी येथे सुरक्षा दलांनी एक न फुटलेला यूएक्सओ हा जिवंत बॉम्ब निकामी केला. काही दिवसांपूर्वी जिह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये यूएक्सओ बॉम्ब सापडले होते. खात्मा केलेल्या तीन दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, ‘झेड’ श्रेणीच्या सुरक्षा कवचात बुलेटप्रूफ कारचा समावेश परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, ‘झेड’ श्रेणीच्या सुरक्षा कवचात बुलेटप्रूफ कारचा समावेश
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जयशंकर यांच्या...
Operation Sindoor – पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसचे सॅटेलाईट फोटो आले समोर; धावपट्टी, इमारती बेचिराख
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
अंबाबाई, जोतिबा मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई
कश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही! युद्धविरामाच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला
पाकिस्तानात घुसून मोदींनी नक्षलवाद्यांना खतम केले! बावनकुळेंचे अगाध ज्ञान
जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखाली, ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांचा शोपियानमध्ये चकमकीत खात्मा