तुरुंगातील कैद्यांची उत्पादने कैद्यांसाठीच वापरणार
राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते. त्यात आंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी लागणारे साबण, दंतमंजन, फिनाईल यांचाही समावेश असतो. कैद्यांसाठी या वस्तू बाहेरून विकत घेतल्या जातात. आता कैद्यांकडून बनवलेल्या वस्तू कैद्यांसाठीच वापरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसे केल्यास त्यावर होणाऱ्या खर्चाची बचत होऊ शकते. त्यासाठी या वस्तूंच्या उत्पादनात वाढ करून त्यांचा सर्व कारागृहांना आवश्यकतेनुसार वेळेवर पुरवठा केला जावा असे निर्देश गृह विभागाने आज जारी केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List