मुंबईत कोरोनाचे 24 तासांत 22 रुग्ण, राज्यात दिवसभरात 33 जणांना संसर्ग

मुंबईत कोरोनाचे 24 तासांत 22 रुग्ण, राज्यात दिवसभरात 33 जणांना संसर्ग

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र असताना आज अचानक राज्यभरात 33 कोरोना रुग्ण सापडले. मुंबईत सर्वाधिक 22 रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यासह मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबईत जानेवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून तीन दिवसांपूर्वी केईएममध्ये दोघा कोरोना रुगणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेने सेव्हन हिल्स, कस्तुरबा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 112 बेड राखीव ठेवले आहेत.

असे आढळले बाधित रुग्ण

जानेवारी ते आतापर्यंत 6477 कोरोना चाचण्या जानेवारी ते आतापर्यंत 165 रुग्ण पॉझिटिव्ह
गुरुवार 22 मे रोजी 33 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

ठाण्यात तिघांना लागण

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातही कोविडचे तीन रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण कोपरीतील असून त्यांची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे दोन रुग्णांवर घरात आणि एका रुग्णावर मुलुंडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यानंतर महापालिका आरोग्य यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आली असून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 19 बेड्सचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. याशिवाय पालिकेच्या आरोग्य केंद्रात कोरोना संशयित रुग्णांची अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. तसेच खासगी रुग्णांनाही चाचणी करण्याचे आणि रुग्ण आढळल्यास त्याची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्या सईकडे मी कधीच जेवायला जाणार नाही’; त्या एका प्रसंगामुळे सोनाली कुलकर्णीने हातच जोडले  ‘त्या सईकडे मी कधीच जेवायला जाणार नाही’; त्या एका प्रसंगामुळे सोनाली कुलकर्णीने हातच जोडले 
बॉलिवूडमध्ये जशी मैत्री असते तशीच पार्टी, डिनर आणि कलाकारांमधील मैत्री ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येही पाहायला मिळते. त्यांचे किस्सेही चर्चेत असतात....
सलमान खान प्रकरणात मोठी अपडेट समोर, धोका लक्षात घेत पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
‘हेरा फेरी 3’ मध्ये ‘बाबुराव’ची भूमिका परेश रावलऐवजी आता हा अभिनेता साकारणार? अभिनेत्याने केला खुलासा
लग्नाची अंगठी, भगवद्गीतेतील श्लोक असलेली बनारसी ब्रोकेड कॅप; कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने ग्लॅमरस लूकसोबत दिली संस्कृतीची झलक
भाजप आणि संघावर व्यंगचित्र काढले, हेमंत मालवीय यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
हिंदुस्थानी खासदारांचे विमान उतरण्यापूर्वी मॉस्को विमानतळावर ड्रोन हल्ला!
म्हैसूर साबणाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर हिंदी अभिनेत्रीला का केलं? संतप्त कन्नडीगांनी कर्नाटक सरकारला धू धू धूतलं