IPL 2025 – पाऊस फक्त एक निमित्त, बंगालविरुद्ध कट रचला; तृणमूल काँग्रेसचा भाजपवर निशाणा

IPL 2025 – पाऊस फक्त एक निमित्त, बंगालविरुद्ध कट रचला; तृणमूल काँग्रेसचा भाजपवर निशाणा

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलल्याने तृणमूल काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. पाऊस फक्त बहाणा आहे. हा एक कट असून राजकीय कारणांमुळे सामन्याचे ठिकाण बदलण्यात आल्याचा आरोप पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरुप बिस्वास यांनी केला आहे.

पश्चिम बंगालमधील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आयपीएल 2025 चा फायनल सामना खेळवला जाणार होता. मात्र बीसीसीआयने अचानक अंतिम सामन्याचे ठिकाण बदलले. ईडन गार्डन्स स्टेडियमऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल, असे बीसीसीआयने घोषित केले. यानंतर बंगालमधील राजकारण तापले आहे. बंगालधील क्रिकेटप्रेमींना वंचित का ठेवले जात आहे? असा सवाल अरुप बिस्वास यांनी उपस्थित केला.

सुरक्षेचे कारण देत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केल्याने अरुप बिस्वास यांनी मजुमदार यांना प्रत्युत्तर दिले आहे. अरुप बिस्वास म्हणाले की, “सुकांता मजुमदार यांनी ट्विट केले की सुरक्षेच्या कारणास्तव अंतिम सामना हलवण्यात आला आहे, तर बीसीसीआय म्हणते की हा निर्णय खराब हवामानामुळे घेण्यात आला आहे.”

केंद्रीय राज्यमंत्री आणि पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी अरुण बिस्वास यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. मजुमदार यांनी आयपीएल सामन्याचे ठिकाण बदलण्यास ममता बॅनर्जी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आयपीएल अंतिम सामन्याचे ठिकाण बदलणे हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कुशासनाचा आणखी एक सबळ पुरावा आहे. बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, कोलमडलेली प्रशासकीय रचना आणि राजकीय अक्षमता यामुळे आयपीएल अंतिम सामन्याचे ठिकाण बदलल्याचे मजुमदार यांनी सांगितले.

गुजरातमध्ये राज्यात सुशासन आणि पायाभूत सुविधा आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये सर्व काही घडत आहे. पश्चिम बंगालमध्ये फक्त तुष्टीकरण आणि घाणेरडे राजकारण सुरू आहे, असेही मजुमदार पुढे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला वाराणसीतून अटक; गझवा ए हिंद, बाबरी मशिदचे संदेश पाठवून भडकवायचा लोकांची डोकी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला वाराणसीतून अटक; गझवा ए हिंद, बाबरी मशिदचे संदेश पाठवून भडकवायचा लोकांची डोकी
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. तुफैल मकबूल आलम असे त्या व्यक्तीचे...
चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत… हिंदुस्थानचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश
रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी नितीन बगाटे
लातूर जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा
मध्यरात्री सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारी मुलगी नक्की आहे तरी कोण?
Healthy Lifestyle: हृदय विकारापासून बचावासाठी ‘या’ घरगुती पदार्थांचा वापर करा….
Gond Katira: गोंद कतीऱ्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका? खरं की खोटं जाणून घ्या एका क्लिक वर….