Chhattisgarh Encounter – सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, सीआरपीएफचा जवान शहीद; एका माओवाद्याचा खात्मा

Chhattisgarh Encounter – सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, सीआरपीएफचा जवान शहीद; एका माओवाद्याचा खात्मा

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून माओवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. यादरम्यान सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा कोब्रा बटालियनचा एक जवान शहीद झाला. या कारवाईत एका माओवाद्याचाही खात्मा करण्यात आला आहे. सुकमा जिल्ह्यातील तुमरेल गावच्या हद्दीच माओवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

सीआरपीएफची कोब्रा 210 वी बटालियन या कारवाईचे नेतृत्व करत आहे. या कारवाईत छत्तीसगड पोलीस डीआरजी आणि एसटीएफचे जवानही सहभागी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईत एक कोब्रा कमांडो जखमी झाल्याची माहिती मिळते. जखमी जवानाला बाहेर काढण्यासाठी आयएएफचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

माओवाद्यांच्या प्रभावाखाली असलेल्या राज्यांमध्ये प्रमुख दल म्हणून काम करणारी कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा) ही केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) विशेष जंगल युद्धकेंद्र आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;