‘हेरा फेरी 3’ मध्ये ‘बाबुराव’ची भूमिका परेश रावलऐवजी आता हा अभिनेता साकारणार? अभिनेत्याने केला खुलासा
‘हेरा फेरी 3’ मधून बाबू भैया म्हणजेच परेश रावल यांच्या बाहेर पडण्याच्या बातम्या आल्यापासून लोकांनी या चित्रपटाबद्दल खूप नारजी व्यक्त केली होती. या चित्रपटाचा पहिला भाग 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, त्यानंतर चित्रपटातील पात्रे लोकांच्या मनावर कोरली गेली. जेव्हा चाहत्यांना कळले की चित्रपटाचा तिसरा भागाची शुटींग सुरु होणार आहे. तेव्हा लोकांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला. पण आता परेश रावल यांनी ‘बाबुराव’ची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे नक्कीच सर्वांनी नाराजी व्यक्त केली.
‘हेरा फेरी 3’ मधील बाबू रावच्या भूमिकेसाठी आता या नावाची चर्चा
बाबुराव गणपतराव आपटे हे हेरा फेरीमधील पात्र ज्याला लोकांनी खूप प्रेम दिलं. तसेच, हे पात्र चित्रपट त्रिकुटातील सर्वात महत्त्वाचा भाग राहिलं आहे. आता परेश रावल यांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, लोकांनी ‘हेरा फेरी 3’ मधील बाबू रावच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी यांचे नाव सुचवले आहे. तथापि, याबद्दल बोलताना, अभिनेत्याने ते नाकारले आहे.
“त्यांच्यासमोर मी काहीच नाही”
एका मुलाखतीदरम्यान पंकज त्रिपाठी यांनी परेश रावल यांचे वर्णन एक अद्भुत अभिनेता असे केले आहे. त्यांनी या चित्रपटाचा भाग असल्याच्या अटकळांनाही पूर्णविराम दिला आहे. पंकज त्रिपाठी म्हणाले की,”मी वाचले आहे आणि ऐकले आहे की चाहत्यांना मी ती भूमिका करावी असे वाटते. पण, मला वाटत नाही की मी ते करू शकेन. परेश सर एक अद्भुत अभिनेता आहेत आणि मी त्यांच्यासमोर काहीच नाही. मी त्याचा खूप आदर करतो आणि मला वाटत नाही की मी या कामासाठी योग्य व्यक्ती आहे.”
परेश रावल यांच्याकडे मागितली चित्रपट सोडल्याबद्दल 25 कोटी रुपयांची भरपाई
पंकज त्रिपाठी यांचे हे विधान समोर आल्यानंतर अनेक चाहते दुःखी झाले आहेत, पण आता चित्रपटात पुढे काय होणार आहे हे कोणालाही माहिती नाही. या सर्व बाबींमुळे, अक्षय कुमारने परेश रावल यांच्याकडून चित्रपट अर्ध्यावर सोडल्यानंतर झालेल्या नुकसानीसाठी 25 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी परेश रावल यांनी चित्रपट सोडताना साधं त्यांच्याशी बोलणंही केल नाही.
त्यानमुळे आता बाबूरावची भूमिका कोण साकारणार की खरंच पंकज त्रिपाठी या भूमिकेत दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List