भूमिपुत्र कामगारांवर अन्याय करणाऱ्यांना तोडून मोडून टाकू, सेलेबी नासच्या कर्मचाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

भूमिपुत्र कामगारांवर अन्याय करणाऱ्यांना तोडून मोडून टाकू, सेलेबी नासच्या कर्मचाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठीच शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना अन्याय कदापि सहन करणार नाही, भूमिपुत्र कामगारांवर कुणी अन्याय केला तर त्याला तोडून मोडून टाकू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कडाडले. आमचे लचके तोडण्याचा वाईट विचार कुणाच्या मनात असेल तर त्याचे राजकारणात कसे तुकडे करायचे ते ठरवावे लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

मुंबई विमानतळावर ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम करणाऱया तुर्कीच्या ‘सेलेबी’ नास कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आल्याने 3700 कामगारांच्या रोजीरोटीवर गंडांतर आले होते. भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला. सेलेबीच्या जागी येणाऱ्या इंडो-थाई कंपनीत सर्व कामगारांना त्याच पगारावर सामावून घेण्यात आले. त्याबद्दल सेलेबीच्या कर्मचाऱ्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.

भगव्याचे तेज कामगारांनी दाखवून दिले

शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरेंचा विजय असो… असा विजय शिवसेनेला नकोय. तुमच्या हृदयातून आलेली ती भावना पाहिजे. जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे? हातामध्ये जो भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचे तेज कामगारांनी यानिमित्ताने दाखवून दिले आहे, असे कौतुकोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.

सावध रहा, कुणकुण लागली तरी कळवा

या विजयावर किंवा आपण जे संकट परतावून लावले त्याच्यावर नुसता भरोसा ठेवून राहू नका, उद्या असेच काहीतरी घडतेय अशी कुणकुण लागली तरी ताबडतोब मला किंवा भारतीय कामगार सेनेला कळवा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी कामगारांना केले.

भाजपनेच सेलेबीला हिंदुस्थानात आणले

बंदी घातल्यावर कळले की, ती तुकाaची होती. आपल्या देशाविरुद्ध जो कोणी असेल त्याच्याकडून आम्हाला भाकरी नकोच आहे. देशाच्या शत्रूकडून आम्हाला काही नकोच आहे. पण सेलेबीला हिंदुस्थानात आणणारी भाजपचीच लोकं होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शत्रू लचके तोडायला गिधाडासारखा टपलाय, एकजूट रहा

हजारो कामगारांची रोजीरोटी वाचवल्याबद्दल कामगारांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे ऋण व्यक्त केले. त्यावर, हा पराक्रम कामगार एकजुटीने, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावाने केला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ग्राऊंड स्टाफमुळे या विमानांच्या घारी आकाशात उडतात. तशी गिधाडेही असतात. त्यापासून कामगारांचे रक्षण व्हावे अशी शिवसेनेला नेहमीच चिंता असते. त्यामुळे एकजूट रहा; कारण एकदा का एकजूट तुटली तर लचके तोडायला आपले शत्रू मोकळे असतात, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Monsoon Update : मान्सूनबाबत गुडन्यूज, आयएमडीचा नवा अंदाज समोर IMD Monsoon Update : मान्सूनबाबत गुडन्यूज, आयएमडीचा नवा अंदाज समोर
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या मान्सूनसंदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळे...
दीपिका पदुकोण अनप्रोफेशनल; दिग्दर्शकाकडे केल्या अशा मागण्या की, तिला चित्रपटातूनच काढून टाकलं
पत्नीच्या निधनानंतर, बॉलिवूड अभिनेता 18 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिव्ह-इनमध्ये; म्हणाला “कशाला हवंय लग्न…”
सेलिब्रिटींमध्ये कोरोनाचा हाहाकार, शिल्पानंतर ‘ही’ अभिनेत्री आणि तिची आई कोरोनाच्या विळख्यात
न्याहरीला शिळी भाकरी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत?
तोंडावर लघवी केली, व्हायरसचं इंजेक्शन दिलं! भाजप आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल
गव्हाचे पीठ चेहऱ्याला लावण्याचे असंख्य फायदे, वाचा