लातूर जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा

लातूर जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा

मांजरा, तेरणा आणि तावरजा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढत आहे. पावसाचा हा वेग कायम राहिल्यास मांजरा, तावरजा व तेरणा नदीवरील प्रकल्प आणि कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे लवकरच निर्धारित पाणी पातळीपर्यंत भरतील, अशी शक्यता आहे. यामुळे प्रकल्पांमध्ये येणारे अतिरिक्त पाणी मांजरा, तेरणा आणि तावरजा नद्यांमार्फत सोडावे लागेल.

या पार्श्वभूमीवर मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीकाठावरील शेतकरी तसेच नदीकाठी वस्ती करणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक प्रवेश टाळावा, तसेच आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे रेणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधाऱ्यांवरील पाणीपातळी पूर्ण संचय पातळीच्या वर गेली असून, सध्या बंधाऱ्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान केंद्राने पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, त्यामुळे रेणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, रेणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सावध राहावे आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विक्रोळी, घाटकोपरमधील डोंगरउतारावरील झोपड्यांवर दरड कोसळण्याचा धोका विक्रोळी, घाटकोपरमधील डोंगरउतारावरील झोपड्यांवर दरड कोसळण्याचा धोका
पावसाळय़ात मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱयामुळे डोंगरउतारावरील झोपडय़ांवर दरडी कोसळण्याचा धोका असतो. हा धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने विक्रोळी आणि घाटकोपरमधील...
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती ओक यांचे निधन
प्रशासकीय मनमानीला चाप, निवृत्तीनंतर शिस्तभंगाची शिक्षा देता येणार नाही
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला वाराणसीतून अटक; गझवा ए हिंद, बाबरी मशिदचे संदेश पाठवून भडकवायचा लोकांची डोकी
चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत… हिंदुस्थानचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश
रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी नितीन बगाटे
लातूर जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा