रत्नागिरी – पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला चोपले

रत्नागिरी –  पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला चोपले

ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानविषयी प्रेम दाखवणाऱ्या तरुणाला देशप्रेमी रत्नागिरीकरांनी इंगा दाखवला. समाजमाध्यमांत पाकिस्तान जिंदाबाद लिहिणाऱ्या व पंतप्रधान नरेंद्र मोदींची निंदा करणाऱ्या तरुणाला रत्नगिरीकरांनी चोप दिला. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शहर पोलिस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच तो ज्या आस्थापनेत कामाला होता तेथून त्याला काढून टाकण्यात आले आहे.

महम्मद बद्रुद्दीन परकार (वय 21, मुळः केजीएम प्लाझा, गोवळकोट, चिपळूण. सध्या रा.महादेव नगर, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. 7) रात्री निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने 6 आणि 7 मे च्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करत दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. एका मुस्लीम युवकाने उघडपणे ‘पाकिस्तान जिंदाबाद…मोदी किलर आहे…मोदी मुळे हे घडत आहे पाकिस्तान साठी प्रार्थना करा’ असे स्टेट्स संशयिताने त्याच्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपला ठेवून ते व्हायरल केले. यामुळे खळबळ उडाली. देशप्रेमी रत्नागिरीकरांच्या ही गोष्ट लक्षात आली. हा तरुण एका प्रसिद्ध आस्थापनेत काम करतो. त्या आस्थापनेत जाऊन रत्नागिरीकरांनी माहिती घेतली असता त्या युवकाला स्टेटसमुळे आदल्या दिवशीच कामावरून काढून टाकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रत्नागिरीकर देशप्रेमी तरुणांनी त्या तरुणाला आज शोधून गाठले. त्याला यथेच्छ चोप दिला.

रत्नागिरीकर देशप्रेमी तरुणांनी चोप दिल्यानंतर जखमी अवस्थेत तरुणाला पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने दंगल पथकाला पाचारण केले होते. शहर पोलीस निरीक्षक शिवरकर यांच्यासह पोलिस पथकही याठिकाणी दाखल झाले होते. शहर पोलिस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;