म्हैसूर साबणाची ब्रँड अॅम्बेसेडर हिंदी अभिनेत्रीला का केलं? संतप्त कन्नडीगांनी कर्नाटक सरकारला धू धू धूतलं
अभिनेत्री तमन्ना भाटियाची निवड म्हैसूर सँडल साबणाच्या प्रमोशनसाठी झाली. परंतु ही निवड होताक्षणी कर्नाटकवासिय मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. कर्नाटक सरकारने अभिनेत्री तमन्ना भाटियाची निवड म्हैसूर सॅंडल साबणाची, ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीचे अधिकृत पत्रक कर्नाटक सरकारने जाहीर केली. हे पत्रक वाचल्यानंतर मात्र कानडिगांचा रोष चांगलाच उफाळून आला. बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाची कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून 6.2 कोटींना नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने केलेली ही नियुक्ती खटकल्याने, या निर्णयावर कर्नाटकातील जनतेने सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाषिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत जनतेने सरकारलाच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. जनतेने सरकारवर केवळ टीकाच केली नाही तर, प्रश्नांची सरबत्तीही सुरु केली आहे. यावर सोशल माध्यम X वर एका महिलेने लिहीले आहे की, “जेव्हा @AshikaRanganath सारख्या स्थानिक कन्नड तरुण अभिनेत्रींना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घेतले जाऊ शकते. मग हिंदी चित्रपटांतील अभिनेत्रीची नियुक्ती आणि प्रचार का करायचा?” असे अनेक प्रश्नचिन्ह सोशल माध्यमावर आता उपस्थित होऊ लागले आहे.
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे ब्रेकअप! वाचा प्रेमापासून ते ब्रेकअप पर्यंतचा प्रवास
होणाऱ्या टिकेवर प्रतिक्रिया देताना, राज्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री एम.बी. पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, “‘कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड कन्नड चित्रपट उद्योगाचा आदर करते. काही कन्नड चित्रपटही बॉलिवूड चित्रपटांना जोरदार टक्कर देत आहेत. म्हैसूर सँडल साबण हा कर्नाटकातील एक उत्तम ब्रँड आहे. या साबणाचे लक्ष्य कर्नाटकाबाहेरील बाजारपेठेत प्रवेश करणे आहे. बाजारातील तज्ज्ञांशी बराच विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दीपिका पदुकोण, रश्मिका मंदान्ना, पूजा हेगडे आणि कियारा अडवाणी यासारख्या इतर प्रमुख सेलिब्रिटींचाही विचार करण्यात आला होता. परंतु तमन्नाचे सोशल मीडियावरील फाॅलोअर्स पाहता, तसेच इतर अनेक गोष्टींचा विचार करुनच तमन्नाची निवड करण्यात आली आहे.कर्नाटकच्या बाहेरील बाजारपेठेत आक्रमकपणे प्रवेश करण्यासाठी बराच विचारमंथन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तमन्ना भाटियाने हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्ल्याळम अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List