अभिनेता सलमान खानच्या घरात शिरण्याचा प्रयत्न; दोघांना अटक
बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घरात शिरणाऱया दोघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. जितेंद्रकुमार सिंग आणि ईशा छाब्रा अशी त्या दोघांची नावे आहेत. सुरक्षा भेदून दोन जण आत शिरल्याने सलमानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ते दोघे नेमके कशासाठी घरात शिरले होते, याचा तपास वांद्रे पोलीस करत आहेत. अभिनेता सलमान खानला बिष्णोई गँगकडून जीवे ठार मारण्याची धमकी आली होती. तसेच सलमानच्या घरावरदेखील गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्याची दखल घेऊन पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मंगळवारी जितेंद्रकुमार हा सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसला. तो लिफ्टपर्यंतदेखील गेला. तो वारंवार गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरू पाहत होता. त्याला सुरक्षा रक्षकांनी हाकलून लावले. त्यानंतर तो दुसऱया दिवशीदेखील आत घुसला. जितेंद्र हा इमारतीच्या लिफ्टपर्यंत गेला. हा प्रकार सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच त्याला ताब्यात घेतले. ही घटना ताजी असताना बुधवारी ईशा नावाची महिला गॅलेक्सी इमारतीत शिरली. ती सलमानच्या फ्लॅटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. तिलादेखील ताब्यात घेऊन अटक केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List