रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी नितीन बगाटे
रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. रत्नागिरी येथे बदली होण्यापूर्वी ते पोलीस उपायुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर येथे कार्यरत होते.
नितीन बगाटे हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील निशाणा येथील रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केले होते. आयआयटीतून शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षे ते पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यानंतर ते आयपीएस अधिकारी बनले. परभणी येथे 2018 ते 2020 याकाळात ते प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. नितीन बगाटे यांची दबंग अधिकारी म्हणून ख्याती आहे. त्यांनी परभणी, चंद्रपूर, सिंधुदुर्ग येथे काम केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List