IPL 2025 लखनौची हार के बाद जीत, मार्शच्या शतकामुळे लखनौचा गुजरातवर सुपर विजय
सामन्यांत 5 विजयांची नोंद करत गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या लखनौचा खेळ घसरला आणि सलग चार पराभवांमुळे त्यांचे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंग झाले. मात्र आज मिचेल मार्शच्या घणाघाती शतकामुळे लखनौने गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरातचा 33 धावांनी दणदणीत पराभव केला. चार पराभवांनंतर मिळवलेल्या विजयामुळे लखनौच्या चेहऱयावर अनेक दिवसांनंतर हास्य उमलले. गुजरातच्या पराभवामुळे आता टॉप टूमध्ये स्थान मिळवण्याची शर्यत आणखी वाढली आहे.
लखनौचे 236 धावांचे आव्हान गुजरातला खूप अवघड जाईल असे वाटत होते; पण गुजरातच्या साई सुदर्शन (21), शुभमन गिल (35) आणि जोस बटलरने (33) धावांचा धमाका करत गुजरातला विजयाच्या ट्रकवर ठेवले. 3 बाद 16 नंतर शेरफन रुदरपर्ह्ड आणि शाहरुख खानने 6 षटकांत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत 85 धावांची भन्नाट आणि सुसाट भागी रचत गुजरातच्या पाठलागाला वेग दिला. 24 चेंडूंत 54 धावांचे आवाक्यात असलेले लक्ष्य उरले असताना 17 व्या षटकात ओरूरर्पने रुदरपर्ह्डची (38)विकेट काढली आणि गुजरातला धक्का दिला. या धक्क्याने गुजरातच्या पाठलागातील सारी हवाच काढून टाकली. मग शाहरुख खाननेही (57)संयम गमावला आणि दुसरीकडे गुजरातनेही सामना गमावला. रुदरपर्ह्ड बाद झाल्यानंतर पुढील 23 चेंडूंत गुजरातला केवळ 20 धावाच काढता आल्या.
मिचेल मार्शचा शतकी धमाका
आयपीएलच्या या मोसमात 4 अर्धशतकांसह 3 उपयुक्त खेळी करणाऱया मिचेल मार्शने आज लखनौसाठी या मोसमातील पहिले शतक झळकवले. त्याने 64 चेंडूंत केलेल्या 117 धावांच्या खेळीमुळेच लखनौ 2 बाद 235 अशी जबरदस्त धावसंख्या उभारू शकला. त्याने एडन मार्परमसह 91 धावांची सलामी दिल्यानंतर निकोलस पूरनसह 121 धावांची विक्रमी भागी केली. मार्श 8 षटकार आणि 10 चौकारांची बरसात करत 19 व्या षटकात बाद झाला.
पूरन ठरला सिक्सर किंग
आयपीएलच्या प्रारंभीच्या सामन्यांमध्ये झंझावाती अर्धशतकांसह खणखणीत षटकारांचा पाऊस पाडणारा पूरन आज सिक्सर किंग ठरला. त्याने स्वतःचाच गेल्या वर्षीचा 36 षटकारांचा विक्रम मोडीत काढताना यंदा 39 षटकारांचा नवा विक्रम रचला. आज त्याने 27 चेंडूंत नाबाद 57 धावा ठोकताना 5 षटकार खेचले. त्याने या मोसमात पाचव्यांदा 25 पेक्षा कमी चेंडूंत वेगवान अर्धशतक साजरे करण्याचाही विक्रम आपल्या नावावर केला.
स्कोअरबोर्ड
चौकार
1926
षटकार
1083
अर्धशतक
132
शतक
7
विकेट
748
3 विकेट
57
धावा
22282
सर्वाधिक धावा
साई सुदर्शन
638
सर्वाधिक विकेट
नूर अहमद
21
आयपीएल गुणतालिका
संघ सा. वि. प. गुण नेररे
गुजरात 13 9 4 18 0.602
बंगळुरू 12 8 3 17 0.482
पंजाब 12 8 3 17 0.389
मुंबई 13 8 5 16 1.292
दिल्ली 13 6 6 13 – 0.019
लखनौ 13 6 7 12 – 0.337
कोलकाता 13 5 6 12 0.193
हैदराबाद 12 4 7 9 – 1.005
राजस्थान 14 4 10 8 – 0.549
चेन्नई 13 3 10 6 – 1.030
टीप ः सा. ः सामना, वि. ः विजय,
प. ः पराभव, नेररे ः नेट रनरेट
(ही आकडेवारी गुजरात-लखनौ
सामन्यापर्यंतची आहे.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List