Monsoon Update – हॅप्पी मान्सून! हवामान विभागाने वर्तवला पुढील चार आठवड्यांचा अंदाज

Monsoon Update – हॅप्पी मान्सून! हवामान विभागाने वर्तवला पुढील चार आठवड्यांचा अंदाज

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. हवामान खात्याकडून पुढील चार आठवड्यांत देशभरात मान्सूनची स्थिती काय असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मान्सूनचे आगमन संपूर्ण देशात खूप आशादायक असेल असे म्हणत येणाऱ्या मान्सूनच्या शुभेच्छा पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत दिल्या आहेत.

पुढील चार आठवडे कसा असेल मान्सून?

पहिला आठवडा 22 मे ते 29 मे – पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर जास्त पावसाची शक्यता आहे. तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसरा आठवडा 29 मे ते 5 जून – पश्चिम किनारपट्टी आणि उत्तर किनारपट्टीवर जास्त सकारात्मक पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू आणि एसआयके वगळता भारतातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

तिसरा आठवडा 5 जून ते 12 जून – मध्य भारत, पूर्व भारत, उत्तर प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर केरळ आणि एसआयकेमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चौथा आठवडा 12 जून ते 19 जून – महाराष्ट्र, एनआयके, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, जीडब्ल्यूबी, बिहार, उत्तर प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला वाराणसीतून अटक; गझवा ए हिंद, बाबरी मशिदचे संदेश पाठवून भडकवायचा लोकांची डोकी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला वाराणसीतून अटक; गझवा ए हिंद, बाबरी मशिदचे संदेश पाठवून भडकवायचा लोकांची डोकी
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. तुफैल मकबूल आलम असे त्या व्यक्तीचे...
चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत… हिंदुस्थानचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश
रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी नितीन बगाटे
लातूर जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा
मध्यरात्री सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारी मुलगी नक्की आहे तरी कोण?
Healthy Lifestyle: हृदय विकारापासून बचावासाठी ‘या’ घरगुती पदार्थांचा वापर करा….
Gond Katira: गोंद कतीऱ्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका? खरं की खोटं जाणून घ्या एका क्लिक वर….