विमानतळ करार रद्द, तुर्की कंपनीची हायकोर्टात धाव

विमानतळ करार रद्द, तुर्की कंपनीची हायकोर्टात धाव

हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच हिंदुस्थानच्या विमान वाहतूक सुरक्षा नियामक (बीसीएएस) ने गेल्या आठवडय़ात राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तुर्की कंपनी सेलेबी नासची सुरक्षा मंजुरी तत्काळ रद्द केली. या निर्णयामुळे सेलेबी कंपनीचा मुंबई विमानतळावरील करारही रद्द करण्यात आल्याने कंपनीने याविरोधात हायकोर्टात धाव घेत दाद मागितली आहे.

तुकाaच्या सेलेबीची उपकंपनी सेलेबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस ही मुंबई विमानतळावर सेवा देते. करार अचानक रद्द केल्याने कंपनीचे नुकसान होत आहे. या प्रकरणी कंपनीने हायकोर्टात तीन याचिका दाखल केल्या असून सुरक्षा मंजुरी आणि करार संपुष्टात आणण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. याचिकांमध्ये म्हटले आहे की, केंद्राचा हा निर्णय बेकायदेशीर असून तो रद्द करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत. हायकोर्टात लवकरच या याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Monsoon Update : मान्सूनबाबत गुडन्यूज, आयएमडीचा नवा अंदाज समोर IMD Monsoon Update : मान्सूनबाबत गुडन्यूज, आयएमडीचा नवा अंदाज समोर
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या मान्सूनसंदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळे...
दीपिका पदुकोण अनप्रोफेशनल; दिग्दर्शकाकडे केल्या अशा मागण्या की, तिला चित्रपटातूनच काढून टाकलं
पत्नीच्या निधनानंतर, बॉलिवूड अभिनेता 18 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिव्ह-इनमध्ये; म्हणाला “कशाला हवंय लग्न…”
सेलिब्रिटींमध्ये कोरोनाचा हाहाकार, शिल्पानंतर ‘ही’ अभिनेत्री आणि तिची आई कोरोनाच्या विळख्यात
न्याहरीला शिळी भाकरी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत?
तोंडावर लघवी केली, व्हायरसचं इंजेक्शन दिलं! भाजप आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल
गव्हाचे पीठ चेहऱ्याला लावण्याचे असंख्य फायदे, वाचा