सलमान खान प्रकरणात मोठी अपडेट समोर, धोका लक्षात घेत पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
Salman Khan: अभिनेता समलान खान याला आतापर्यंत अनेक जीवेमारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ज्यामुळे अभिनेत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला. अनेकदा सलमानच्या घराबाहेर देखील अशा काही हलचाली घडल्या ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. दरम्यान 19 मे च्या मध्यरात्री एका महिलेने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. महिलेला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं. पण आता सलमानच्या सुरक्षेत मोठे बदल देखील करण्यात आले आहेत.
सलमान खानच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. आता गॅलेक्सी बिल्डिंगमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ‘ओळख पुष्टीकरण’ आवश्यक असणार आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या सुरक्षेसाठी एक नवीन प्रणाली आणण्याचा विचार केला जात आहे.
प्रस्तावित सुरक्षा उपायांतर्गत, गॅलेक्सी बिल्डिंगमध्ये प्रवेश करणाऱ्या कोणत्याही नवीन व्यक्तीला आता प्रवेश करण्यापूर्वी इमारतीच्या एका रहिवाशाकडे त्याची ओळख पटवावी लागेल. दोन दिवसांच्या आत दोन अनोळखी व्यक्ती, एक पुरूष आणि एक महिला, अभिनेत्याच्या खाजगी निवासस्थानी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करताना पकडल्या गेल्या. म्हणून सुरक्षेत बदल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या दोन गंभीर घटनांनंतर मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. संबंधित घटनांमुळे अभिनेत्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शिवाय खाजगी इमारतींच्या सुरक्षेत अधिक दक्षतेची गरजही अधोरेखित झाली आहे. मुंबई पोलिसांचा असा विश्वास आहे की ओळख पडताळणीसारख्या प्रणाली गॅलेक्सी बिल्डिंगमध्ये अनधिकृत प्रवेश रोखतील.
त्याच बरोबर अभिनेत्याला देण्यात येणारी सुरक्षा आणखी मजबूत करतील. बहुतेक सोसायटींमध्ये, जर एखादी अनोळखी व्यक्ती सोसायटीच्या गेटवर आली तर त्याला सुरक्षा रक्षकाला सांगावे लागते की तो कोणाच्या घरी भेटणार आहे.
त्यानंतर सुरक्षा रक्षक त्या घराच्या इंटरकॉमवर कॉल करून त्याची पुष्टी करतो आणि नंतर सुरक्षा रक्षक त्याला गेटमधून आत जाण्याची परवानगी देतो. जर अशा गोष्टी बहुतेक सोसायट्यांमध्ये असतील, तर इतक्या मोठ्या बॉलिवूड अभिनेत्याचा बिल्डिंगमध्ये का नाही. असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List