Operation Sindoor – आमच्या सहनशिलतेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये, अन्यथा सणसणीत प्रत्युत्तर मिळेल; राजनाथ सिंहांचा पाकला खणखणीत इशारा
ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानचा हल्ला परतवून लावत हिंदुस्थानने लाहोरमधील पाकची मिसाइल डिफेन्स सिसस्टिम ध्वस्त करून टाकली आहे. पाकिस्तान विरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा पाकला खणखणीत इशारा दिला आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे आणि हिंदुस्थानच्या सैन्य अकल्पनीय काम करत आहे. यासाठी सैन्याचे हृदयापासून अभिनंदन. हिंदुस्थानच्या सैन्याने शौर्याचा परिचय दिला आहे. पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यासाठी हिंदुस्थानच्या सैन्याचे मनापासून अभिनंदन, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याचे कौतुक केले.
दिल्लीत आयोजित डीआरडीओच्या एका कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. सैन्याने जे शौर्य आणि पराक्रम दाखवला आहे यासाठी खूप खूप अभिनंदन. पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानमध्ये सैन्याने दहशतवाद्यांची ठिकाणं ध्वस्त केली. ऑपरेशन सिंदूरचे यश कौतुकास्पद आहे. त्यात कुठल्याही निष्पाप व्यक्तीचा जीव गेला नाही. कारवाईत मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले, असे राजनाथ सिंह म्हणाले.
Operation Sindoor नंतरची ही आहे बुलेटप्रुफ तयारी, पाकिस्तानची आता होणार ऐशी की तैशी..
आमच्या सहनशिलतेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये अन्यथा काल सारखे सणसणीत प्रत्युत्तर दिले जाईल, असा खणखणीत इशारा राजनाथ सिंह यांनी पुन्हा पाकला दिला. आपल्या सुरक्षा दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये जे केले ते आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. ‘उच्च दर्जाच्या गुणवत्तेचा एक नमुना काल आपल्याला दिसला. ज्या अचूकतेने #OperationSindoor पार पाडण्यात आले ते अकल्पनीय आणि कौतुकास्पद आहे. यामध्ये मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले, असे राजनाथ सिंह म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर ज्या अचूकतेने पार पाडले गेले ते अकल्पनीय आणि कौतुकास्पद आहे. कोणत्याही निष्पाप व्यक्तीला इजा न करता सैन्याने ज्या पद्धतीने ही कारवाई केली ते आपल्या प्रोफेशनल आर्म्ड फोर्सेसकडे असलेल्या उच्च दर्जाची उपकरणांमुळे शक्य झाले. अशा परिस्थितीत डीआरडिओचा ही कॉन्क्लेव्हला एक अतिशय महत्त्वाची ठरते, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List