Operation Sindoor- पाकिस्तानला ‘चायना माल’ पडला महागात, हिंदुस्थानच्या ‘ड्रोन स्ट्राइक’ने लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा ध्वस्त
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानच्या लष्कराने Operation Sindoor सुरू केले आहे. एअर स्ट्राइक करून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो हिंदुस्थानने उधळून लावला. त्यानंतर हिंदुस्थानने ड्रोन स्ट्राइक करत लाहोरची एअर डिफेन्स यंत्रणा निकामी केली. ही एअर डिफेन्स यंत्रणा पाकिस्तानने चीन कडून घेतली होती अशी माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे चायना माल किती बंडल असतो ते पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं सांगत सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येत आहे.
7-8 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने केलेल्या प्रतिहल्ल्यांनी लाहोरचे रक्षण करणारी एअर डिफेन्स यंत्रणा पूर्णपणे निकामी केली आहे. लाहोर हे पाकिस्तानचे प्रमुख व्यावसायिक केंद्र असून त्याची अवस्था उघड्यावर पडल्यासारखी झाल्याने पाकिस्तानी नागरिक चांगलेच घाबरले आहेत.
ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून हिंदुस्थानने पाकिस्तानच्या हद्दीत आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (POK) मध्ये दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
Operation Sindoor
Pakistan’s Bid to Escalate Negated- Proportionate Response by India.https://t.co/E6e65goX9R#OperationSindoor@DefenceMinIndia@SpokespersonMoD@HQ_IDS_India pic.twitter.com/mURL8hplRA
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 8, 2025
इस्रायलची आयर्न डोम ही सर्वात जास्त सुरक्षित मानली जाणाऱ्या हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे. हिंदुस्थानकडे S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान लाहोरसाठी ढाल म्हणून चिनी HQ-9 एअर डिफेन्स प्रणालीचा एक प्रकार वापरतो. चीनने पाकिस्तानला पुरवलेल्या HQ-9 च्या यंत्रणेला HQ-9P म्हणतात आणि ते खासकरून पाकिस्तानसाठी कस्टमाइज केले गेले आहे. P हा शब्द पाकिस्तानसाठीच वापरला असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते.
HQ-9 किंवा HQ9P हा पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीचा मुख्य आधार मानला जातो.
2024 च्या पाकिस्तान डे परेडमध्ये पहिल्यांदाच लांब पल्ल्याच्या HQ-9P जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र (SAM) प्रणालीचे सार्वजनिक प्रदर्शन करण्यात आले होते.
‘चीनने पुरवलेले HQ-9P 2021 मध्ये सेवेत दाखल झाले आणि त्याची रेंज 125 किलोमीटर आहे. ते चिनी सेवेतील 250 किलोमीटरच्या HQ-9 प्रकारांपेक्षा कमी प्रभावाचे आहे’, असे 2024 च्या पाकिस्तान डे परेडवरील डिफेन्स न्यूजच्या अहवालात म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List