‘आमदारांच्या समितीला 15 कोटी रुपये देणार होते…’, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

‘आमदारांच्या समितीला 15 कोटी रुपये देणार होते…’, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात बुधवारी रात्री एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. अधिकाऱ्यांनी ही रक्कम आमदारांच्या समितीला देण्यासाठी जमा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. या प्रकरणावरुन शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाला आणि आमदार अर्जुन खोतकर यांना घेरले आहे. सरकारी जागेत पैसा जमा होत आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते काय करत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला. या दौऱ्यात शासनाची जी विकास कामे झाली आहे, ती योग्य प्रकारे झाली की नाही? ते तपासण्याचे काम अंदाज समिती करत असते. परंतु, धुळे जिल्ह्यात या कामांमध्ये प्रचंड घोटाळे झाला आहे. भ्रष्टाचार झाला आहे. यामुळे शिवसेना नेते आमदार अर्जून खोतकर यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर १५ कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराने घेतली. गेल्या तीन दिवसांपासून ही रक्कम जमा होत होती. पाच कोटी रुपये जमा झाले होते. उर्वरित १० कोटी नंतर जमा होणार होते, असे राऊत यांनी म्हटले.

शिवसेना नेते आमदार अर्जून खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते म्हणाले, ही समिती विशेषता समितीचे अध्यक्ष अर्जून खोतकर किती भ्रष्ट आहे, ते समोर आले आहे. १५ कोटी जमवण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु हे प्रकरण आता ईडी आणि सीबीआयकडे देण्याची गरज आहे.

आमदार अनिल गोटे यांचे कौतूक करत संजय राऊत यांनी सांगितले की, माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसैनिकांचा दबाव वाढल्यावर हे प्रकरण उघड झाले. या प्रकरणात अडकलेले काही लोक फरार झाले आहेत. अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले का? हे पाहावे लागले. परंतु या माध्यमातून गेल्या वर्षभरात आणि त्याच्या पूर्वीच्या अडीच वर्षात अंदाज समितीचे दौरे कुठे, कुठे झाले, त्यात काय काय झाले, हे सर्व पाहवे लागणार आहे, असे राऊत यांनी म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या सुपरस्टारच्या लेकीचा अभिनय सोडण्याचा निर्णय; फ्लॉप करिअर अन् नंतर क्रिकेटरशी लग्न या सुपरस्टारच्या लेकीचा अभिनय सोडण्याचा निर्णय; फ्लॉप करिअर अन् नंतर क्रिकेटरशी लग्न
दरवर्षी बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स लाँच होत असतात. पण त्यापैकी काही जणच आपले स्थान निर्माण करू शकतात. तर काहीजण एक-दोन...
या अभिनेत्रीने कधीही लग्न केलं नाही; संपूर्ण आयुष्य विधवेसारखं जगण्याचा घेतला निर्णय
एकनाथ शिंदे लुटारुंच्या टोळीचे मुखिया, अर्जुन खोतकर व त्यांच्या पीएला तात्काळ अटक करा – हर्षवर्धन सपकाळ
Nashik- ‘आपला जन्म नाशिकचा…’ म्हणत पालकमंत्री पदासंदर्भात छगन भुजबळ यांचं मोठं विधान
Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत महाराष्ट्रातील जवान शहीद
हेरा फेरी 3: परेश रावल यांनी 11 लाख रुपये साइनिंग रक्कम घेतली? अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊसने केला दावा
डोळ्यावरील ब्लॅक सर्कलवर हे आहेत घरगुती रामबाण उपाय, वाचा