डोळ्यावरील ब्लॅक सर्कलवर हे आहेत घरगुती रामबाण उपाय, वाचा

डोळ्यावरील ब्लॅक सर्कलवर हे आहेत घरगुती रामबाण उपाय, वाचा

डोळ्यांचे आरोग्य जपणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या डोळ्यावर ताण येतो तेव्हा डोळ्यांतून पाणी येणे तसेच डोळे चुरचुरणे सुरू होते. या कारणांमुळे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतोत. यालाच डार्क सर्कल असेही म्हणतात. डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा अतिशय नाजूक असते. सतत टीव्ही किंवा संगणकावर बसून आपल्या डोळ्यांवर ताण येणे साहाजिकच आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला अगदी लहान मुलांनाही चष्मा असलेला आपण बघतो. ही काळी वर्तुळे कमी करण्यासाठी घरगुती साधे सोपे कोणते उपाय आहेत हे आपण पाहणार आहोत. तसेच या उपायांमुळे आपल्या डोळ्यालाही कोणती इजा होणार नाही.

बटाटे डोळ्यांखालील सूज आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात. बटाट्यामध्ये असलेल्या स्टार्चमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. एक बटाटा घ्या आणि त्याचे गोल तुकडे करा. आता हे गोल तुकडे प्रभावित भागावर पाच ते दहा मिनिटे हलक्या हाताने घासा. यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते.

टोमॅटो आणि लिंबू यांचा वापर करून आपण डार्क सर्कल घालवु शकतो. याकरता टोमॅटो आणि लिंबाचा रस चांगला नीट मिसळुन घ्या. त्यानंतर डोळ्यांखालील भागाला हलक्या हातांनी 15 मिनिटांसाठी मालिश करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

 

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने, ब्लॅक सर्कलवर उपचार करण्यासाठी सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे. थंडगार काकडीचे तुकडे बंद डोळ्यांवर 10 ते 15 मिनिटे ठेवा. नंतर थंड पाण्याने डोळे धुवा.

काळी वर्तुळे घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर आपण करू शकतो. टोमॅटो त्वचेचा रंग स्वच्छ करण्यासाठी एक चांगला नैसर्गिक ब्लीचिंग स्त्रोत्र आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन-सी, अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-एजिंग गुणधर्म डोळ्याखालील काळ्या डांगावर तसेच वर्तुळांवर प्रभावी आहेत.

टोमॅटोमध्ये असलेल्या लाइकोपीनमुळे सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत होते. टोमॅटोच्या चकत्या आपण नियमितपणे 15 दिवस डोळ्यांवर ठेवल्या तर काळ्या सर्कलपासून आपली नक्कीच मुक्तता होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;