IMD Weather Update: महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचं संकट; 18 जिल्ह्यांना हाय अलर्ट, आयएमडीचा झोप उडवणारा इशारा
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांसह मुंबईतील चाकरमान्यांना बसला आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये बुधवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, याचा मोठा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला, काही ठिकाणी ओव्हरहेड वायरवर झाडाच्या फांद्या कोसळल्यानं लोकलची वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान आज पुन्हा एकदा आयएमडीकडून (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवेचा वेग देखील या काळात प्रचंड राहणार असल्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य प्रदेशपासून ते कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List