मासिक पाळीमधील वेदना कमी करण्यासाठी ही योगासने आहेत सर्वात बेस्ट
बहुतांशी महिलांसाठी मासिक पाळी म्हणजे वेदना हेच समीकरण ठरलेलं आहे. अशावेळी मासिक पाळीमधील वेदना आणि त्रास सहन करताना अनेकींना नाकीनऊ येतात. परंतु मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी काही आसनांचा सराव करणे हे खूप गरजेचे आहे. मासिक पाळीच्या वेदना आणि क्रम्पमधून आराम मिळवण्यासाठी काही योगासन करता येतील. म्हणजे महिन्यातील ते चार दिवस सुखकर जातील.
बालासनहे एक अतिशय सोपे योगासन आहे. याकरता प्रथम दोन्ही पाय गुडघ्यांपासून वाकवून आणि खाली वाकून आणि डोके चटईवर ठेवून वज्रासनात बसा. तुमचे हात समोर ठेवा. या पोझमध्ये सुमारे ३० सेकंद रहा. हे आसन केवळ मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम देत नाही तर लवचिकता देखील वाढवते आणि त्या काळात ताण कमी करून मूड स्विंगला प्रतिबंधित करते.
वज्रासन
मासिक पाळीच्या दरम्यान होणारे वेदना आणि क्रॅम्प कमी करण्यासाठी तसेच लघवीशी संबंधित समस्यांपासून आराम मिळविण्यासाठी वज्रासन फायदेशीर आहे. हे आसन पेल्विकच्या स्नायूंना बळकटी देते आणि तणाव देखील कमी करते. हे पचनासाठी देखील खूप फायदेशीर आहे आणि खाल्ल्यानंतर देखील केले जाऊ शकते.
Work from home Yoga- वर्क फ्राॅम होम करताना मानेवर ताण येतोय? मग हे तीन योगासनांचे प्रकार नक्की करा!
बटरफ्लाय
मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदना आणि क्रॅम्प दूर करण्यासाठी बटरफ्लाय आसन करणे देखील खूप फायदेशीर आहे. हे आसन पुनरुत्पादक अवयवांना देखील बळकटी देते आणि गर्भधारणेदरम्यान फायदेशीर मानले जाते. हे करणे देखील खूप सोपे आहे. हे आसन तुम्हाला तणावापासून दूर ठेवण्यास देखील मदत करते.
मत्स्यासन
महिलांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. ही आसने केल्याने महिलांना मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो आणि थायरॉईडपासून संरक्षण मिळते. हे आसन केल्याने प्रजनन आरोग्य सुधारण्यास देखील मदत होईल. मत्स्यासन महिलांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. ही आसने केल्याने महिलांना मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो आणि थायरॉईडपासून संरक्षण मिळते. हे आसन केल्याने प्रजनन आरोग्य सुधारण्यास देखील मदत होईल.
अनुलोम विलोम प्राणायम
मासिक पाळीच्या दरम्यान मूड स्विंग्स अनेकदा होतात. हे टाळण्यासाठी महिलांनी अनुलोम-विलोमचा सराव करावा. हे आसन केल्याने शांती मिळते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो. हा प्राणायाम त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List