प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शकाने संपवलं आयुष्य, व्हॉट्सॲप नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण
मराठी सिनेविश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शकाने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. दिग्दर्शकाच्या मृत्यूनंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. शिवाय कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिग्दर्शकाने नागपूरमधील रामकृष्ण मठात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्या दिग्दर्शकाने आत्महत्या केली त्या दिग्दर्शकाचं नाव आशिष उबाळे असं आहे.
आशिष उबाळे यांनी आत्महत्या करत कारण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सांगितसं आहे. सध्या याप्रकरणी कसून चौकशी करत असल्याची देखील माहिती मिळत आहे. आशिष उबाळे हे मूळचे नागपूरचे असून ते महाल परिसरात राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लहान भावाला भेटण्यासाठी आशिष उबाळे नागपुरात आले होते. त्यांचा लहान भाऊ नागपुरातील रामकृष्ण मठामध्ये सेवेकरी म्हणून काम करत आहे. त्यामुळे आशिष उबाळे देखील मठातच मुक्कामी होते. त्यांनी मठात जेवण देखील केलं. शनिवारी गेस्ट रुममध्ये आराम करण्यासाठी आले त्यानंतर बाहेर आलेच नाही. उबाळे यांनी गळफास घेवून स्वतःला संपवलं असेल… अशी शक्तता पोलिसांनी वर्तवली आहे.
शनिवारी संध्याकाळी आशिष उबाळे यांचा भाऊ सारंग त्यांना उठवण्यासाठी आला. रुम उघडल्यानंतर आशिष उबाळे मृत अवस्थेत होते. पोलिसांना मृत आशिष उबाळे यांच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअपवर एक सुसाईड नोट आढळली. नोटमध्ये मृत्यू कारण नमूद करण्यात आलं होतं.
डोक्यावर प्रचंड कर्जाचं डोंगर असल्यामुळे आत्महत्या केली… असं लिहिलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आषिश उबाळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं. शिवाय लेखण देखील केलं. एकेकाळी इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव मोठं झालं होतं. पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय कर्ज देखील वाढलं. ज्यामुळे आशिष उबाळे निराशेच्या गर्तेत गेले. अखेर त्यांनी स्वतःलं सर्व संकटांमधून मुक्त केलं.
पुण्यात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आशिष उबाळे नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईमध्ये आले. त्यांनी गजरा, अग्नी, एका श्वासाचे अंतर, किमयागार, चक्रव्यूह अशा मालिकांचे दिग्दर्शन केलं. गार्गी, आनंदाचे डोही आणि बाबूरावला पकडा अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केलं.
आशिष उबाळे यांचा गार्गी सिनेमा कार्ल्सबर्ग चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला. पण आशिष उबाळे दिग्दर्शिक गार्गी आणि आनंदाचे डोही हे दोन सिनेमे कधी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेच नाहीत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List