आमच्याकडे 250 ग्रॅमचा अणुबॉम्ब आहे! स्वतःच्याच दाव्याने पाकिस्तानचं हसू झालं
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानकडून अनेक मोठे निर्णय घेतले जात आहे. अशाच पाकिस्तानही मोठ-मोठे दावे करत आहे. पाकिस्तानकडून येणाऱ्या अणुबॉम्बच्या इशाऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. अलिकडेच पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी उघडपणे हिंदुस्थानला अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा दिला. याचसोबत पाकिस्तानकडे ‘130 अण्वस्त्रे’ असल्याचा दावा केला.
पाकिस्तानकडून हिंदुस्तानला येणाऱ्या धमक्यांची ही पहिली वेळ नाही. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही एका पाकिस्तानी मंत्र्यांनी असेच मोठे दावे केले होते. त्यावेळी त्यांनी पाककडे ‘125 ते 250 ग्रॅम’ वजनाचे छोटे अणुबॉम्ब असल्याचा दावा केला होता. पाकिस्तानच्या या अर्थहीन विधानांमुळे तेच गोत्यात आले आहेत. पाकिस्तानच्या या विधानांमुळे हिंदुस्थानातून त्यांच्यावर टीका केली जातेय.
पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार 125 ते 250 ग्रॅम’ वजनाचे छोटे अणुबॉम्ब खरच बनवले जातात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अणुबॉम्बला (युरेनियम 235 किंवा प्लूटोनियम 239)काम करण्यासाठी एका विशिष्ट प्रमाणाची आवश्यकता असते. यालाच क्रिटिकल मास म्हटले जाते.
काम करण्यासाठी कमीत कमी प्रमाणात पदार्थाची आवश्यकता असते, ज्याला ‘क्रिटिकल मास’ म्हणतात. सामान्यत: या पदार्थांचे प्रमाण 5 ते 50 किलोग्रॅम दरम्यान असते. उदाहरणार्थ, हिरोशिमावर टाकलेल्या ‘लिटिल बॉय’ बॉम्बचे वजन फक्त काही किलोग्रॅम इतके होते, तर संपूर्ण बॉम्बचे वजन सुमारे 4,400 किलोग्रॅम (४.४ टन) होते. या बॉम्बमध्ये युरेनियमचे दोन भाग एकमेकांवर वेगाने आदळले गेले, जे क्रिटिकल मासपर्यंत पोहोचले आणि मग त्याचा स्फोट झाला.
अणुबॉम्बसोबत ट्रिगर मैकेनिज्म, डिटोनेशन सिस्टम, सुरक्षा उपकरण आणि कंटेनमेंट यांसारख्या गोष्टी जोडल्या जातात. त्यामुळे 10 ते 15 किलोपेक्षा हलका कोणताही अणुबॉम्ब तांत्रिकदृष्ट्या बनवणे शक्य नाही. त्यामुळे पाकिस्तानचे दावे किती पोकळ आणि खोटे आहेत हे यावरून स्पष्ट होऊ शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List