पाकिस्तान आणि संजय राऊत एकाच माळेचे मणी.. व्हिक्टीम कार्ड खेळतात – मनसे नेत्याची टीका

पाकिस्तान आणि संजय राऊत एकाच माळेचे मणी.. व्हिक्टीम कार्ड खेळतात – मनसे नेत्याची टीका

‘नरकातला स्वर्ग’ हे संजय राऊतांचे पुस्तक आज प्रकाशित होणार आहे, मात्र त्यापूर्वीच या पुस्तकावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या पुस्तकामध्ये राऊतांनी गौप्यस्फोट केले असून त्यामुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. आधी भाजप नेते, मग शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी राऊतांवर कडाडून टीका केलीच. मात्र त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. पाकिस्तान आणि संजय राऊत सारखेच आहेत, दोघेही व्हिक्टीम कार्ड खेळतात असे म्हणत देशपांडे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.

मान ना मान मैं तेरा मेहमान

तसेच राज ठाकरे आपले मित्र आहेत, आपण तुरूंगात होतो तेव्हा त्यांनी एकदा फोन करायला हवा होता, अशी खंतही राऊंतानी व्यक्त केली होती. पण राज ठाकरे कधीच म्हणत नाहीत की राऊत माझे मित्र आहेत, मान ना मान मैं तेरा मेहमान। अशी त्यांची गत झाली आहे, असे म्हणत संदीप देशपांडेनी राऊतांना टोला हाणला.

” राज ठाकरे यांच्याबाबत संजय राऊत नेहमी म्हणतात की राज माझे मित्र आहे, हेच जवळ येतात. पण राज ठाकरे तर कधी बोलले नाही की ही माझे मित्र आहे. मान ना मान मैं तेरा मेहमान अशी त्यांची गत आहे. आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे, म्हणून त्यांना राज साहेबांची आठवण येते. पण आमच्या 16000 महाराष्ट्र सैनिकांवर कारवाई केली तेव्हा त्यांना मैत्री का नाही आठवली?. माझ्या 9 वर्षांच्या मुलाला प्रश्न विचारले तेव्हा कुठे होते? असं विचारत संदीप देशपांडेनी टीकास्त्र सोडलं.

संजय राऊत आणि पाकिस्तान एकाच माळेचे मणी

संजय राऊत यांनी लिहीलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकातील दाव्यांवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बरीच टीका केली आहे. संजय राऊत आणि पाकिस्तान सारखेच आहेत. पाकिस्तानने स्वतः हल्ला केला आणि व्हिक्टीम कार्ड खेळतात, संजय राऊतही तसेच करत आहेत. ते स्वातंत्रसैनिक म्हणून स्वतःला दाखवत आहेत. पण ते आर्थिक घोटाळा प्रकरणी जेल मध्ये गेले होते, पण त्या आरोपांबाबात कोणतंही वक्तव्य त्यांनी पुस्तकात केलेलं नाही. पत्रा चाळ आरोपाखाली तुम्ही आत गेला होता, त्याबद्दल का लिहीलं नाही असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.

आता बाळासाहेब हयात नाहीत, या पुस्तकात राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल लिहीलं आहे. पण कोण होतं पाहायला? मी पुस्तक वाचलं नाही आणि विकत घेऊन पण वाचण्यासारखे नाही अशा शब्दांत त्यांनी विषय संपवला. माझी अजून ED इन्क्वायरी झाली नाही, आणि तशी होईल असे मी काही केले नाही असा टोलाही त्यांनी हाणला. मी काय राऊत यांच्यासारखा लेखक नाही, त्यामुळे अजून काही पुस्तक लिहिण्याचा विचार नाही, असेही देशपांडे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रेल्वे स्थानकात आता ऑफिस-कॉलेजचे काम करा, या स्थानकात एअरपोर्टसारखे डिजिटल लाऊंज रेल्वे स्थानकात आता ऑफिस-कॉलेजचे काम करा, या स्थानकात एअरपोर्टसारखे डिजिटल लाऊंज
मुंबई सेंट्रल स्थानकात एअरपोर्टसारखे डिजिटल लाऊंज उभारण्यात येणार आहे. या डिजिटल लाऊंजमध्ये अगदी विमानतळासारख्या सोयी आणि सुविधा मिळणार आहेत. भारतीय...
हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते पण, धर्म… संजय राऊत यांच्या पुस्तकातील दावा काय?
उपनगरीय रेल्वे प्रकल्पांना चालना: २०२५-२६ रेल्वे बजेटमध्ये MUTP प्रकल्पांसाठी १७७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर
विराट-अनुष्का व्यतिरिक्त या स्टार्सही प्रेमानंद महाराजांचे भक्त; कुंजला पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी
अनेक महिलांना अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात, आज वयाच्या 58 व्या वर्षी 26 वर्ष लहान तरुणीसोबत करतोय संसार
‘तुला ब्लाउज काढावं लागेल’, बिग बींच्या सिनेमाच्या दिग्दर्शकाने माधुरीकडे मागणी करताच…
‘एक नंबर, तुझी कंबर…’ लाल रंगाची साडी, केसात गजरा; जब्याच्या शालूचा जबरदस्त डान्स; वजन वाढल्यामुळे ट्रोल