Rohit Sharma Stand – शरद पवारांसोबत माझं नाव दिसतंय…; रोहित शर्माने व्यक्त केल्या भावना
टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आणि मुंबईचा राजा म्हणून रोहित शर्माने आपल्या नावाचा जगभरात डंका वाजवला आहे. रोहित शर्माच्या या अविश्वसनीय, अतुलनीय आणि विस्फोटक कारकिर्दीचा गौरव सोहळा मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर पार पडला. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) माध्यमातून वानखेडे स्टेडिमयवर रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोहित शर्माने आई-वडील आणि पत्नी रितीकाला मंचावर बोलवलं. तसेच आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
“आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. मी कधी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. मोठं होतं असताना, मुंबईकडून आणि देशाकडून खेळण्याच माझं स्वप्न होतं. ते माझं स्वप्न मी पूर्ण केलं. परंतु, या ऐतिहासिक स्टेडियमवर माझ्या नावाचा स्टँड असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. क्रिकेटमधील अनेक दिग्गजांसोबत आणि जगातील ग्रेट नेत्यांपैकी एक असलेल्या शरद पवारांसोबत माझं नाव दिसत असल्याने मला खूप चांगल वाटतं आहे. मी शब्दात माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. आजच्या सोहळ्यात माझं संपूर्ण कुटुंब उपस्थित आहे. माझ्या या यशामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यांच्यामुळेच मी आज तुमच्यासमोर इथे उभा आहे. मी दोन फॉरमॅटमधून निवृत्त झालो आहे. पण मी अजूनही एका फॉरमॅटमध्ये खेळत आहे.” असं म्हणत रोहित शर्माने शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनसह सर्वांचे आभार मानले.
#WATCH | Mumbai | At the inauguration ceremony of a stand in Wankhede to be named after him, Indian ODI men’s cricket team captain Rohit Sharma says, “What is going to happen today, I have never dreamed of. As a kid growing up, I wanted to play for Mumbai, for India. No one… pic.twitter.com/BH2VCjmxFi
— ANI (@ANI) May 16, 2025
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महेंद्रसिंग धोनीनंतर टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावणारा रोहित शर्मा दुसरा हिंदुस्थानी कर्णधार आहे. रोहित शर्माने टीम इंडियासाठी 67 कसोटी सामन्यांमध्ये 4301 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर कसोटीमध्ये 12 शतकं आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 276 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 48.67 च्या सरासरीने 11 हजार 168 धावा चोपून काढल्या आहेत. वनडेमध्ये रोहितच्या नावावर तीन द्विशतकं, 32 शतकं आणि 58 अर्धशतकं आहेत. याव्यतिरिक्त रोहित शर्मा आयपीएलमधीलही सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List