कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या विजय शाहला भाजप का पाठीशी घालतंय?
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल विजय शाह यांनी केलेले विधान अक्षम्य आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावरून तत्काळ हटवा, अशी मागणी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईची आणि यशाची माहिती जगाला देणाऱया कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. एकीकडे देशभरातून या मंत्र्यावर कारवाईची मागणी होत असताना भाजप मात्र या मंत्र्याला पाठीशी घालताना दिसत आहे.
कुंवर विजय शाह हे आठव्यांदा आमदार बनले असून, ते आदिवासी समाजातून आलेले आहेत. त्यामुळेच आदिवासी समाजाकडून कुठलाही रोष उत्पन्न होऊ नये म्हणून भाजप यांच्या पाठीशी उभी आहे. तसेच 11 तारखेला झालेल्या या विधानावर अजूनही कारवाई नसल्यामुळे, भाजप नेते यांना पाठीशी घालताहेत हे स्पष्ट दिसून येत आहे. आदिवासी समाजाकडून रोष ओढवल्यास, मतांवर खूप मोठा परीणाम होऊ शकतो.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री शाह यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तर कर्नल सोफिया यांचे काका, चुलत भाऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे शाह यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शहा हे संवैधानिक पदावर आहेत. त्यांचे हे विधान अक्षम्य आहे. सोफिया ही आपल्या देशाची, एका लष्करी अधिकाऱ्याची मुलगी असून तिने देशासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. शहा यांना मंत्रीपदावरून तत्काळ हटवा, अशी मागणी सोफिया यांचे चुलत भाऊ बंटी सुलेमान यांनी केलेली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List