Jammu Kashmir – बडगाममध्ये लश्कर-ए-तोयबाशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात पोलिसांनी प्रतिबंधित लश्कर-ए-तोयबा (LeT) शी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले दहशतवादी परिसरात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत होते. तसेच स्थानिकांना दहशतवादात सामील होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. मुजमिल अहमद, इश्फाक पंडित आणि मुनीर अहमद अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.
तीन दहशतवाद्यांना मगममध्ये अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक हातबॉम्बसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले तिघेही जण आबिद कयूम लोन या सक्रिय लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याच्या संपर्कात होते. आबिद कयूम लोन हा 2020 मध्ये पाकिस्तानात घुसला आणि या संघटनेत सामील झाला.
आबिद हा सध्या पाकिस्तानातून सक्रिय आहे. अटक केलेले दहशतवादी त्याच्या निर्देशानुसार काम करत होते. तिघांकडे परिसरात दहशतवादी कारवाया करण्याचे काम सोपवण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List