उपनगरीय रेल्वे प्रकल्पांना चालना: २०२५-२६ रेल्वे बजेटमध्ये MUTP प्रकल्पांसाठी १७७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर

उपनगरीय रेल्वे प्रकल्पांना चालना: २०२५-२६ रेल्वे बजेटमध्ये MUTP प्रकल्पांसाठी १७७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढविणे आणि त्यांना चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांसाठी (MUTP) १७७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या वर्षीच्या ( ७८९ कोटी रुपये ) अर्थसंकल्पीय अनुदानापेक्षा ही रक्कम १२५% टक्के जादा आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात उपनगरीय रेल्वे सेवेच्या दर्जात वाढ होणार आहे.

रेल्वेने एमयुटीपी प्रकल्पांसाठी १७७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रकमे इतकेच महाराष्ट्र सरकारही त्यांचा वाटा देणार आहे.त्यामुळे लोकलची सेवा सुधारणे, गर्दी कमी करणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि प्रवाशांच्या सोयी आणि सुविधेत वाढ करणे यास चालना मिळणार आहे. महत्त्वाच्या MUTP प्रकल्पांच्या कामाला त्यामुळे गती मिळणार आहे. गेल्यावर्षीही ( आर्थिक वर्ष २०२४-२५) निधीची कोणतीही अडचण नव्हती, ज्यामुळे एमयूटीपीचे काम कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिले. शिवाय, काम जसजसे पुढे जाईल तसतसे, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सुधारित अनुदानात अतिरिक्त निधी वाटप केला जाणार आहे.

आर्थिक पाठबळ मिळाले

या मजबूत आर्थिक पाठबळामुळे, नवीन कॉरिडॉर, स्टेशन अपग्रेड आणि रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रमुख एमयूटीपी प्रकल्पांना चालना मिळणार आहे.त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम उपनगरीय रेल्वे नेटवर्क मिळणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे सीएमडी विलास वाडेकर यांनी म्हटले आहे.

Budget Allocation for 2025-26

Mumbai Urban Transport Project (Phase-II) – 100 cr

Mumbai Urban Transport Project (Phase-III) – 800 cr

Mumbai Urban Transport Project (Phase-III/A) – 877 cr

TOTAL 1777 cr

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;