महाराष्ट्र धर्म वाचवूया! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये संवाद आणि समन्वय असणे महत्त्वाचे असल्याने आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, असे ते म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सपकाळ यांना फटकारे, ‘पहावा विठ्ठल’ ही पुस्तके आणि लोणार सरोवराचे छायाचित्र भेट दिले. तर यावेळी सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी यांच्यावर आधारित पुस्तक भेट दिले. याप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद स्थापित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र धर्म जगला तरच देश जगेल, ही आपल्या महाराष्ट्र धर्माची खासियत असल्याचे सपकाळ यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र धर्मावर मोठे संकट आले आहे. ही संघर्षाची वेळ आहे. या लढय़ामध्ये दोन्ही पक्ष महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आगामी काळातही सोबत राहणे आवश्यक आहे. – हर्षवर्धन सपकाळ
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List