चीन-हाँगकाँग आणि सिंगापूर-थायलंड मध्ये भयानक विषाणूचा थैमान, भारताला देखील धोका?

चीन-हाँगकाँग आणि सिंगापूर-थायलंड मध्ये भयानक विषाणूचा थैमान, भारताला देखील धोका?

2020 मध्ये जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना विषाणू पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड सारख्या अनेक आशियाई देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या देशांमधील रुग्णालयांमध्ये गर्दी वाढण्याव्यतिरिक्त, मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे, जी गेल्या एका वर्षातील सर्वाधिक आहे.

सर्वात महत्त्वाती गोष्ट म्हणजे चीन आणि थायलँड यांसारख्या देशात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू पुन्हा जगभरात हाहाकार माजवणार का? अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. एवढंच नाही तर, भारताने देखील सतर्क राहण्याची गरज आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

हाँगकाँगमध्ये कशी आहे परिस्थिती?

हाँगकाँगमधील सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनमधील कम्युनिकेबल डिसीज ब्रँचचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या एका वर्षातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. गेल्या एका वर्षातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. रुग्णालयात देखील रुग्णांची गर्दी दिसत आहे. मृतांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. हाँगकाँगमध्ये कोविड – 19 मुळे 31 जणांचं मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने त्याचा परिणाम सामान्य जीवनावर होऊ लागला आहे. कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रसिद्ध गायक ईसन चॅन यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला. कॉन्सर्टच्या अधिकृत वेइबो पेजवरील एका निवेदनात ही माहिती उघड झाली.

सिंगापूरमध्ये कोरोनाचा धोका..

सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत 28 टक्क्यांनी वाढ ढाली आहे. मे महिन्याच्या आधी कोरोणाच्या विळख्यात अडकलेल्या रुग्णांची संध्या 14 हजार 200 पर्यंत पोहोचली. या काळात रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही 30 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

चीनमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चीनच्या सीडीसीनुसार, 4 मे पर्यंतच्या गेल्या पाच आठवड्यात रुग्णालयांमध्ये कोरोना चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर दुप्पट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोंगक्रान महोत्सवानंतर थायलंडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

भारताला देखील आहे धोका?

आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत भारताने देखील सतर्क राहण्याची गरज आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत डॅशबोर्डनुसार, भारतात आतापर्यंत कोविड-19 चे फक्त 93 रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोना साथीच्या नवीन लाटेची कोणतीही चिन्हे नाहीत. असं देखील सांगितलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अटॅक येऊन मरून जाईल, नाही तर आत्महत्या करावी लागेल, बडा नेता मातोश्रीत रडला; राऊतांच्या पुस्तकात काय? अटॅक येऊन मरून जाईल, नाही तर आत्महत्या करावी लागेल, बडा नेता मातोश्रीत रडला; राऊतांच्या पुस्तकात काय?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाने राजकीय वादळ निर्माण केलं आहे. या पुस्तकात ईडीच्या कारवाया, सरकारचा...
उद्या ‘संडे ब्लॉक’ कुठे आणि किती वाजता, घरातून निघण्याआधी नजर टाका
हिंदुस्थानने किती विमाने गमावली? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल
Mumbai News – मुंबई विमानतळावर ISISचे दोन दहशतवादी अटक, NIA ची कारवाई
Kedarnath helicopter Crashed – केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्सला अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
हरयाणाची युट्यूबर निघाली गद्दार! पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याने ज्योती मल्होत्राला अटक
दिल्लीत आपच्या 15 नगरसेवकांचे राजीनामे, MCD मध्ये वेगळा गट स्थापन करण्याची केली घोषणा