अजितदादांचे तो मी नव्हेच… शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नव्हते! कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा अकोला, अमरावती आणि बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा

अजितदादांचे तो मी नव्हेच… शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नव्हते! कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा अकोला, अमरावती आणि बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा

महायुतीच्या जाहीरनाम्यातच विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा वादा केला होता; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात झटकले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नव्हते, असे स्पष्टीकरण अजितदादा यांनी आज दिले.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यासंदर्भात महायुती सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. याकडे कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले. यावर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिले आहे का? मी तरी दिलेले नाही, असे म्हणत अजितदादांनी हात वर केले. त्यांच्या या विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याने आता लवकरच कर्जमाफी करण्यात येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अजित पवार यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेने शुक्रवारी अकोला, अमरावती, बुलढाण्यात ट्रक्टर मोर्चांद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक दिली. अमरावतीत शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, बुलढाण्यात प्रवक्ता जयश्री शेळके, अकोल्यात आमदार नितीन देशमुख यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. डोक्याला भगवे पटके बांधून आणि हाती भगवे झेंडे घेऊन हजारो शेतकरी, त्यांचे कुटुंबीय आणि शिवसैनिक रणरणत्या उन्हात या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीने संयुक्त जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याची घोषणा फडणवीस, अजितदादा आणि शिंदेंनी केली होती.

बळीराजाच्या मागण्या…

  • शेतमालाला योग्य भाव द्या
  • सरसकट पीक विमा द्या
  • रखडलेले सिंचन अनुदान द्या
  • वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण
  • वीज बिल माफ करा
  • शेतीसाठी मोफत वीज द्या
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘माझा अंघोळ करतानाच व्हिडीओ…’, करुणा शर्मांच्या आरोपाने खळबळ, आणखी एक याचिका दाखल ‘माझा अंघोळ करतानाच व्हिडीओ…’, करुणा शर्मांच्या आरोपाने खळबळ, आणखी एक याचिका दाखल
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. करुण शर्मा यांनी न्यायालयात आता आणखी एक याचिका दाखल...
शोलेमधील सांभाच्या लेकींना पाहिलंत का? सौंदर्याच्याबाबतीत अभिनेत्रींनाही देतात टक्कर, हॉलिवूडमध्येही डंका
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानातून येणाऱ्या पोस्ट व पार्सल सेवेवर बंदी
IMD Alert – येत्या 5 दिवसांत महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान खात्याचा इशारा
Pahalgam Terrorist Attack – पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मूसाचा सुगावा लागला? सुरक्षा दलांना मिळाली गुप्त माहिती
भावाला न्याय मिळेपर्यंत चप्पल घालणार नाही, संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
आई गं काय गोड दिसतीयेस…, प्राजक्ता माळीच्या कातील अदा, चाहत्यांचा नजरा हटेना