23 वर्षांची शिक्षिका 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळाली, म्हणाली पोटात त्याचेच बाळ; पोलीसही हैराण

23 वर्षांची शिक्षिका 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळाली, म्हणाली पोटात त्याचेच बाळ; पोलीसही हैराण

गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक 23 वर्षीय महिला शिक्षिका आपल्या 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांनाही गुजरात-राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून अटक केली. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता शिक्षिका पाच महिन्यांची असल्याचे कळाले. हे मूल आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचेच असल्याचा दावा शिक्षिकेने केला आहे. पोलीस आता डीएनए चाचणी करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी शिक्षिका विद्यार्थ्याला सोबत घेऊन पळून गेली. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेवर मुलाचं अपहरण झाल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करत दोघांचा शोध सुरू केला. अखेर गुरुवारी शिक्षिका आणि विद्यार्थ्याला अरावली जिल्ह्यातील गुजरात-राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून अटक केली. यानंतर दोघांनाही सुरतला आणले.

पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता ती विद्यार्थ्यासोबत सुरतहून अहमदाबादला गेली. मग अहमदाबादहून ते दिल्ली, वृंदावन आणि जयपूरला गेल्याचे सांगितले. जयपूरहून परतत असताना, पोलिसांनी दोघांनाही शामलाजी सीमेवर पकडले. तपासादरम्यान, पोलिसांना कळले की महिला शिक्षिका गर्भवती आहे. पोलिसांनी महिला शिक्षिकेला पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल विचारले तेव्हा महिलेने सांगितले की ते मूल अल्पवयीन विद्यार्थ्याचेच आहे.

हे ऐकताच पोलीस हैराण झाले. महिला शिक्षिकेच्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला वडिलांच्या ताब्यात दिले, तर महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;