निर्मल कपूर यांचे निधन
अभिनेता अनिल कपूर यांच्या आई निर्मल कपूर ऊर्फ सुचित्रा यांचे आज निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात बोनी, अनिल, संजय आणि रीना ही मुले तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रकृतीच्या कारणांमुळे निर्मल कपूर यांना गेल्या आठवडय़ात अंधेरीच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या वर्षी आईच्या वाढदिवसाला अनिल कपूरने ‘90 वर्ष प्रेम, बळ आणि अमर्याद त्यागाचे उदाहरण. तुझा मुलगा असणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे,’ अशी भावनिक पोस्ट लिहिली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List