देशाचे लक्ष विचलीत करण्यासाठी जातीय जनगणनेची घोषणा करण्यात आली – संजय राऊत
पहलगाम हल्ल्यानंतर जनतेते संतापाची लाट आहे. जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. आता पाकिस्तानला धडा शिकवा, अशी जनतेची भावना आहे. मोदी स्वतः युद्धाचे नेतृत्व करतील आणि पाकिस्तानात घुसतील, असे जनतेला वाटते. मात्र, त्यांच्या वर्तनातून युद्धाला समोरे जाण्याची तयारी दिसत नाही. आता 56 इंची छातीने पुढाकार घ्यावा, पाकिस्तानात घूसून दहशतवाद्यांना धडा शिकवावा. मात्र, जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी जातीय जनगणेनेची घोषणा करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
जातीय जमगणनेला आमचा पाठिंबा आहे. त्याला विरोध करण्याचे कारण नाही. मात्र, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, जातीय जनणनेची घोषणा करत सरकारने हेडलाईन दिली. पण याची डेडलाईन दिलेली नाही. ही जनगणना कधी करणार, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे पहलगाम हल्ल्याच्या गंभीर विषयापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठीच ही घोषणा करण्यात आली आहे, असे दिसून येते, असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List