अमिताभ यांचा 36 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन; जया बच्चन यांनी संतापून घेतला होता हा निर्णय
बॉलिवूडमध्ये लग्न, प्रेम किंवा अभिनयासाठी वय धरलं जात नाही. कलाकाराला कोणत्याही वयात कोणताही रोल करावा लागू शकतो आणि कथेच्या आवश्यकतेनुसार काही सीन. असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी 50 किंवा 60 वर्षांच्या वयानंतर केवळ बोल्ड सीन्स दिले नाहीत तर त्यांच्या अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत लिपलॉक सीन देखील दिले आहेत. यामध्ये एक नाव अमिताभ बच्चन यांचेही आहे.
36 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन
वयाच्या 60 व्या वर्षी, अमिताभ यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या एका चित्रपटात आपल्यापेक्षा वयाने 36 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन केला होता. त्यावरून सर्वांनीच त्यांना ट्रोल केलं होतं. एवढंच नाही तर जया बच्चनही यामुळे चिडल्या होत्या. त्याच अभिनेत्रीसोबत अभिषेकचं ठरलेलं लग्नही त्यांनी मोडलं होतं.
कुटुंबालाच नव्हे तर प्रेक्षकांनाही धक्का बसला
हा चित्रपट आहे 2005 मध्ये आलेला ‘ब्लॅक’ चित्रपट. या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत त्यांचा लिपलॉक सीन आहे. ब्लॅक चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. तर राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटात राणीने एका मूकबधिर मुलीची भूमिका साकारली होती आणि अमिताभ तिच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते. विशेष म्हणजे या चित्रपटात काम करण्यासाठी अमिताभ यांनी भन्साळींकडून कोणतेही मानधन घेतले नव्हते. परंतु या चित्रपटात अमिताभ आणि राणी यांच्यात एक असा सीन होता ज्याने केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर प्रेक्षकांनाही धक्का बसला.
अमिताभ यांच्या किसींग सीनमुळे अभिषेकचे लग्न मोडले
आश्चर्याचे कारण अमिताभ आणि राणी यांच्यातील लिपलॉक होतं. तर त्यावेळी राणीचे नाव अभिषेक बच्चनशी जोडले गेलं होतं आणि त्यांच्या लग्नाबद्दलही चर्चा सुरू झाली होती. एका रिपोर्टनुसार, राणी आणि अभिषेक बच्चन ‘युवा’ चित्रपटादरम्यान एकमेकांच्या जवळ आले. जया बच्चन राणीला सून म्हणून करून घेण्याच्या तयारीत होत्या. परंतु ब्लॅकमधील किंसींग सीनमुळे अभिषेक आणि राणीचे नाते संपुष्टात आले.त्यांनी त्यांच्या लग्नाला थेट नकार दिला.
अभिषेकचे ते नातेही कायमचे संपुष्टात आले
जेव्हा राणी मुखर्जीचे कुटुंब लग्नाबद्दल बोलण्यासाठी बच्चनच्या घरी गेले तेव्हा जया बच्चनने अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या राणी आणि तिच्या कुटुंबाला मान्य नव्हत्या आणि त्यांना त्या गोष्टींबद्दल खूप वाईट वाटले. एवढेच नाही तर राणीच्या कुटुंबालाही जयाचे वागणे आवडले नसल्याचं म्हटलं गेलं. अभिषेक आणि राणी यांच्यातील संबंध ठीक असतील असे लोकांना वाटत होते, मात्र त्याच्या आणि ऐश्वर्याच्या लग्नाला आमंत्रित न करून अभिषेकने हे नातेही कायमचे संपुष्टात आणले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List